शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागासमोर पाणीपट्टी वसुलीचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:09 IST

Irrigation Department Buldhana पाणीवापर संस्थांसह, औद्योगिक क्षेत्र आणि पालिकांकडे तब्बल सात कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सिंचना सोबतच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने शेती सिंचनासाठी किमान दोन ते तीन आवर्तने मिळणार असून पाणीटंचाईची शक्यताही धुसर आहे. मात्र सातत्याने थकित असलेल्या पाणीपट्टी वसुलीचे आव्हान मात्र यंत्रणासमोर कायम आहे. सिंचन आणि बिगर सिंचन मिळून जिल्ह्यातील पाणीवापर संस्थांसह, औद्योगिक क्षेत्र आणि पालिकांकडे तब्बल सात कोटी रुपयांची थकबाकी आहे.यामध्ये जिल्ह्यातील पाणीवापर संस्थांकडेच चार कोटी ५१ लाख १४ हजार रुपयांची तर बिगर सिंचनापोटी दोन कोटी २५ लाख १५ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या सिंचन विभागाला विशेष मोहिम आता हाती घ्यावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या वर्षी तथा २०१८ मध्ये सिंचन विभागाने थकबाकी असलेल्या यंत्रणांना चक्क नोटीस बजावल्या होत्या. त्याचा त्यावेळी सकारात्मक परिणाम झाला होता. त्याच पद्धतीने आत ही भुमिका या विभागास स्वीकारावी लागणार आहे.

पालिकांचा विचार करता नऊ पालिकांकडे ३१ मार्च २०२० पर्यंत ३२ लाख ३२ हजार रुपयांची थकबाकी असून खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर आणि नांदुरा या पालिकांकडे ही थकबाकी आहे. साधारणत: पालिका व ग्रामीण भागातील प्रादेशिक योजनांसाठी वर्षाकाठी ४० दलघमी पाणी आरक्षीत करावे लागते.एकीकडे पाण्याची मागणी असते मात्र थकबाकी देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालवे, पाट व सऱ्यांची अवस्था बिक आहे. ही थकबाकी वसूल झाल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठीही मोठी मदत मिळून महत्त्म पातळीवर टेल टू हेड पाण्याची आवर्तने देणे शक्य होईल. एमआयडीसीकडे प्रामुख्याने चिखली व खामगाव एमआयडीसीकडे ७१ लाख ६८ हजार रुपयांची थकबाकी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प