शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता महालेंच्या स्वास्थ्यासाठी मंदिरात पूजा दर्गाहवर चादर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

चिखली : आमदार श्वेता महाले यांच्यावर मुंबई येथे झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी ईश्वराला ...

चिखली : आमदार श्वेता महाले यांच्यावर मुंबई येथे झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी ईश्वराला साकडे घालण्यात आले आहे.

याअंतर्गत मर्दडी देवी, रायपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी व नागरिकांना पूजा व देवीला पातळ चढवून आ. महालेंच्या प्रकृतीसाठी साकडे घातले.

जगप्रसिद्ध सैलानी बाबा दर्गाहवर चादर चढविण्यात आली आहे. मंगरूळ नवघरे येथे जमाल शाह बाबा यांच्या दर्ग्यावरदेखील चादर चढविण्यात आली आहे. उंद्री सर्कलमधील मोहाडी येथील महादेव मंदिरात अभिषेक व महापूजा, कोलारा येथील सिद्धेश्वर संस्थान येथे, तर धाड सर्कलमधील धारेश्वर मंदिर व चांडोळ येथील गणपती मंदिरात तसेच शिरपूर येथील जागृत देवस्थान मन्नाथ महाराज येथे शिरपूरवासीयांकडून दुग्धाभिषेक करून आ. महालेंच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी पूजा, अभिषेक, प्रार्थना केल्या जात आहेत. मर्दडी देवी संस्थान येथे जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, डॉ. राजेश्वर उबरहंडे, संदीप उगले, रमेश सोनुने आदी भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सैलानी येथे डॉ. राजेश्वर उबरहंडे, शंकर तरमळे, संदीप सोनुने आदी उपस्थित होते.

वैरागड येथे संजय महाले, दिगंबर राऊत, आदी, तर म्हसला येथे डॉ. अनिल जाधव, विजय भोंडे व योगेश राजपूत आदी उपस्थित होते. कोलारा येथे पं. स. सदस्या मनीषा सपकाळ, संस्थांचे अध्यक्ष साहेबराव पाटील सोळंकी, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, धोंडू पाटिल, सरपंच वनिता सोळंकी आदींसह गावकरी मंडळी उपस्थित होते. मंगरूळ नवघरे येथे पंजाबराव अंभोरे, अमोल जाधव, संजय चेके, राजेश अंभोरे, शे. अनिस, काळू, कय्युम, शरीफ पठाण, संजय घरत, अशोक अंभोरे, अनिल धनवटे, भिवसन पठाण, अशपाक शे. धोटू, शे. इसराईल शे. इब्राहीम, अफझज सय्यद व निशान ईमाम यांच्या उपस्थितीत आ. महालेंच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.