शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे ‘क्युसीआय’ पथक बुलडाणा शहरात दाखल; शहरातील हगणदरीमुक्तीचा दर्जाची होतेय तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:03 IST

बुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे.

ठळक मुद्दे हगणदरी मुक्त मोहिमेमध्ये बुलडाणा शहराचे मुल्यमापनामध्ये शहर पास झाल्याने आता केंद्राचे हे सर्वाेच्च पथक शहरात दाखल झाले आहे. पालिकेकडून या पथकाच्या हालचालीसंदर्भात गोपनियता पाळण्यात येत आहे. तीन सदस्यीय पथक बुलडाण्यात येणार होते मात्र प्रत्यक्षात दोनच समिती सदस्य आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- नीलेश जोशीबुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे. केंद्र सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण प्राधिकरणाचे (क्युसीआय) हे पथक असून राज्य शासनाच्या हगणदरी मुक्त मोहिमेमध्ये बुलडाणा शहराचे मुल्यमापनामध्ये शहर पास झाल्याने आता केंद्राचे हे सर्वाेच्च पथक शहरात दाखल झाले आहे.दरम्यान, पालिकेकडून या पथकाच्या हालचालीसंदर्भात गोपनियता पाळण्यात येत आहे. त्यामुळे हा विषय उत्सूकतेचा ठरतो आहे. गेल्या चार दिवसापूर्वी पालिकेने शहरातील स्वच्छतेचे कंत्राट आगामी काळासाठी निविदा दरसुचीत कमी दर असलेल्या कंत्राटदारांना डावलून जादा दर असलेल्या कंत्राटदाराला देण्याचा ठराव घेऊन प्रयत्न केला होता. त्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारित स्थगिती दिलेली असतानाच केंद्राचे हे पथक शहरात येऊन धडकल्याने हा मुद्दा नागरी सुविधा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर स्वरुपाचा असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय? या विषयासंदर्भात कमालीची गोपनियता पाळली जात आहे.

गुणवत्ता व दर्जाची तपासणीबुलडाणा शहरातील शौचालयांची गुणवत्ता व दर्जा या पथकाकडून तपासल्या जात आहे. यामध्ये शहरातील एकंदर साफसफाई, शासकीय कार्यालयांची स्थिती, सार्वजनिक शौचालयांची तपासणीसह अन्य काही बाबींची या दोन सदस्यी पथकाकडून तपासणी होत आहे. बुलडाणा शहरात १५ हजारांच्या आसपास वैयक्तिक शौचालये दहा सार्वजनिक शौचालये असून त्यामध्ये १०४ शिट आहेत. बुलडाणा शहरातील दोन हजार २०० लोकांनी अनुदानातून शौचालये उभारली आहेत तर चार हजार २०० नागरिकांनी शौचलय उभारण्यासाठी अनुदान उचलले आहे. तीन सदस्यीय पथक बुलडाण्यात येणार होते मात्र प्रत्यक्षात दोनच समिती सदस्य आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान