शेगाव (बुलडाणा) : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना जिल्हा प्रशासनाने प्रवास भाड्यापासून वंचित ठेवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याशिवाय जेवण निवडणूक आयोगाकडून असतानासुद्धा १५0 रुपये कपात करण्यात आल्याची धक्कादायक बाब कर्मचार्यांनी निदर्शना आणली आहे. याबाबत १३३ कर्मचार्यांनी जिल्हाधिकार्यांसह दिल्ली येथील मुख्य निर्वाचन आयुक्तांकडे तक्रार केली आहे. याबाबत वृत्त असे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१४ च्या कामासाठी मतदान केंद्राध्यक्ष तथा मतदान अधिकारी म्हणून शासकीय कर्मचार्यांची नेमणुक करण्यात आली होती. या साठी १00 ते १५0 किमी अंतरावरून या कर्मचार्यांना बोलाविण्यात आले होते. या काळात कर्मचार्यांना प्रशिक्षण व निवडणुकीच्या कामासाठी मुख्यालयापासून किमान तीन वेळा जाणे-येणे करावे लागले. यामुळे सरासरी एकूण प्रवास १000 किमी झाला असून, निवडणूक आयोगाने प्रवासभाडे विचारात घेतले जाणार नाही, असे सूचविण्यात आले होते. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली रक्कम ही अत्यंत तोकडी असून, प्रवासभाड्यातच ही रक्कम गेल्याची ओरड कर्मचार्यांकडून होत आहे. याबाबत २४ सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील १३३ कर्मचार्यांनी मुख्य निर्वाचन आयुक्त, राज्य निवडणुक आयोग, मानवाधिकार आयोग यांच्यासह जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, निवडणुक आयोगाने मतदान अधिकार्यांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले असतानासुद्धा मतदान केंद्रावर साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली नसल्याने खूप त्रास सहन करावा लागला. याशिवाय प्रत्येक निवडणुकीत जेवण हे शासनाकडून आता मिळत होते. मात्र, या वेळेस प्रत्येकी १५0 रुपये जेवणाची कपात करण्यात आली. विशेष म्हणजे ५0 टक्क्क्य़ांपेक्षा जास्त कर्मचार्यांनी जेवणसुद्धा केले नाही. तरीही १५0 रुपयांचा भुर्दंड कर्मचार्यांना देऊन प्रशासनाने एक प्रकारे जेवनाचा व्यवसायच केल्याचा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. प्रवासभाडे आणि जेवनाची रक्कम ता त्काळ परत मिळावी, अन्यथा निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
केंद्राध्यक्ष भाड्यापासून वंचित!
By admin | Updated: October 19, 2014 00:09 IST