शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील शहरांत सीसी कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 02:18 IST

खामगाव, नांदुरा आणि मलकापूर शहरात सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

मलकापूर : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून गणल्या जाणार्‍या जिल्हय़ातील खामगाव, नांदुरा आणि मलकापूर शहरात सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने संवेदनशील भागात येत्या चार वर्षांत हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मलकापूर येथील विश्रामगृहावर १२ फेब्रुवारीला विविध विभागाच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही बाब स्पष्ट केली. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, कार्यकारी अभियंता थोटांगे, नियोजन अधिकारी दीपक सिडाम, एसडीओ चंद्रकांत वानखेडे, तहसीलदार जोगी यावेळी उपस्थित होते. येत्या चार वर्षांसाठी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३0 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. सोबतच हायमास्क दिव्यांसाठी निधी मंजूर झाला असून, मोठय़ा गावात दोन तरी हायमास्क दिवे लावणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मलकापूर पालिकेला नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजना व दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट करीत, यातून शहरातील विकास कामे करण्यात येतील, असे ते म्हणाले. मलकापूर ग्रामीण या नवीन ग्रामपंचायतीसाठी रस्ते, गटारी निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसरीकडे मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी रस्ते विकासांतर्गत साडेसात कोटी रुपये मंजूर केल्याचे पालकंत्र्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाला हा निधी देण्यात आला असल्याचे स्पष्ट करीत ५00 लोकसंख्येवरील एकही गाव डांबरीकरणापासून वंचित राहणार नाही.