शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:20 IST

रेशन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्यानंतर विक्री झालेला साडेचार क्विंटल तांदूळ गुरूवारी सायंकाळी पुन्हा माथनी रोडवर पकडण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रेशन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्यानंतर विक्री झालेला साडेचार क्विंटल तांदूळ गुरूवारी सायंकाळी पुन्हा माथनी रोडवर पकडण्यात आला. याप्रकरणी खामगाव येथील पुरवठा अधिकाºयांच्या तक्रारीवरून जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खामगाव तालुक्यात चवथ्यांदा हा प्रकार घडल्याने, रेशनच्या तांदुळाची खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेटच सक्रीय असल्याचे समोर येत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत  रेशन लाभार्थ्यांना मोफत मिळालेल्या तांदूळाची भंगार व्यावसायिक आणि भुसार मालाचे व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यानंतर या तांदुळाची काळ्या बाजारात विक्री होत आहे. खामगाव तालुक्यात आतापर्यंत गोंधनापूर, सुटाळा, किन्ही महादेव आणि माथनी येथे या घटना उघडकीस आल्या. गुरूवारी सायंकाळी पकडण्यात आलेल्या तांदूळ प्रकरणी पुरवठा निरिक्षक विशाल भगत यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी शेख आबीद शेख हमीद रा.काशीपुरा मुक्ताईनगर जि. जळगाव याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 ऑटोतून वाहतूक!माथनी परिसरातील रेशन लाभार्थ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या १२ कट्टे तांदूळाची एमएच-१२ -डीटी-०२९५ या मालवाहू आॅटोतून वाहतूक केली जात होती. याबाबत माहिती मिळताच  राष्ट्रीय महामार्गावरील जुना टोल नाका येथे पकडण्यात आला. रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष रवि महाले यांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पुरवठा अधिकारी व्ही.एम. भगत यांनी पंचनामा करीत संबंधितांविरोधात तक्रार दिली.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी