लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : स्थानिक वार्ड क्र.६ मध्ये एका जणाला काही लोकांनी घरात कोंडून मारहाण केली. शिवाय त्यांच्या खिशातील १० हजार रुपये लंपास केल्याची घटना ३१ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी प्रताप कौसे याने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमडापूर दिलेल्या तक्रारीनुसार, ३० मे रोजी रात्री १० वाजेला बजरंग नगर डीपी चौकात आरोपी विष्णू खंदलकर यांनी प्रताप कौसे यांना घरात बंद करून काठीने मारहाण केली, तसेच खिशातील पैसे काढून घेतले. यावेळी गावातील इतर ४० ते ४५ ग्रामस्थ उपस्थित होते. तक्रारीवरुन अमडापूर पोलिसानी सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९५, ३४२, १४३, १४७, १४८, ३२४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मारहाण करून रोख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:49 IST