गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नांदुरा चार, बुलडाणा १२, डोंगरखंडाळा एक, देऊळगाव राजा सात, चिखली १२, सवणा एक, अमोना एक, किन्होळा दोन, जळगाव जामोद तीन, वाडी तीन, मलकापूर पाग्रा दोन, साखरखेर्डा एक, लोणार तीन, शारा एक, खामगाव चार, शेगाव एक, तळणी एक, पोफळी एक, मेहकर एक, अंजनी ेक, धाोरा एक, डोणगाव मधील दोन जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान मलकापूर शहरातील चैतन्यवाडी परिसरात राहत असलेल्या ८४ वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसरीकडे ४१ बाधीतांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी झाली. यात बुलडाणा १५, चिखली ९, देऊळगाव राजा सात, लोणार एक, शेगाव सहा, जळगाव जामोद एक आणि सिंदखेड राजातील कोवीड केअर सेंटरमधून दोन जणांची सुटी झाली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १४ हजार ०१६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे १८ हजार ९५४ बाधीतांनी कोरोनावर मात केली. अद्यापही १०१० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १४ हजार ५३५ झाली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ४०७ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. आजपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १७४ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.