शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लस : पायाभूत सुविधांचा प्रशासनाकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:54 IST

Buldhana corona virus news लस उपलब्ध झाल्यास ती त्वरित देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम व तयार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास आरोग्य विभागाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोनाची लस पुढील वर्षी उपलब्ध झाल्यास ती फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रथमत: देण्यात येणार असल्याचे स्पष्टच असले तरी या मोहिमेची व्याप्ती मोठी असणार आहे.मात्र त्यासंदर्भाने वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शक सुचना अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. पुढील काळात अशी मोहिम राबवावी लागल्यास ती किमान सहा ते आठ महिने चालेल. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम असून तसा आढावाही स्थानिक पातळीवर घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. पुढील वर्षी प्रसंगी कोरोनाची लस येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात ती कधी येईल हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारीला प्राधान्य देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर रोजीच्या राज्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राच्या अनुषंगाने ही तयारी सुरू आहे. ही लस उपलब्ध झाल्यास ती त्वरित देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम व तयार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग व तत्सम बाबी पाहता या मोहीमेची व्याप्ती मोठी राहणार आहे. त्यामुळे प्रसंगी ही मोहीम सहा ते आठ महिनेही चालण्याची शक्यता जुन्या मोहिमांचा अनुभव घेतलेल्या आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यानुषंगाने आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असलेली शितकरण उपकरणे, त्यांची स्थिती, वाहतूक, लस देण्यासाठी प्रथमत: कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे प्रशिक्षण हे मुद्दे घेवून माहिती संकलीत करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातील ५३, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातंर्गतच्या १३, खासगी रुग्णालयापैकी १४६ रुग्णालयांमधील सुविधांची सविस्तर माहिती आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर संकलीत करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या