शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संक्रमणाचा शेती कामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; ...

मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; परंतु कोरोनाने सध्या शेतकरी हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांमध्ये १ जूननंतर शिथिलता येण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला मार्केट व ग्रामीण भागातसुद्धा बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर आपल्या शेतातील भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. यामध्ये डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला खते, बी-बियाणे खरेदी करायचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. बहुतांश कुटुंबामध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने त्यांचा आर्थिक कणा उद्‌ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. तेव्हा कृषी केंद्र संचालकांनी आपण आपला माल विकताना योग्य दरात विक्री करावा, कारण शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. हार्डवेअर, खत विक्री केंद्र यामध्ये भरपूर प्रमाणात अवास्तव बिल लावून विक्री करताना आढळून येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र संचालक व हार्डवेअर दुकानदारांनी परिस्थितीचे भान ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.