शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर कारचे टायर फुटले!, अपघातात छत्रपती संभाजीनगरचे चौघे जखमी

By निलेश जोशी | Updated: September 22, 2023 20:14 IST

नीलेश जाेशी, मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर कारचे टायर फूटून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने २२ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या ...

नीलेश जाेशी, मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर कारचे टायर फूटून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने २२ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नागपूर कॉरिडॉरमध्ये दुसरबीड ते मेहकर दरम्यान घडला. अपघातामधील चारही जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये एमएच-०४-जीजीडी-२०१५ क्रमांकाचा चालक आफरोज खान, इब्राहीम खान, वसीम आणि शेख रसूल या चौघांचा समावेश आहे. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिस मदत केंद्राने दिलेल्या माहितीनुसार एमएच-०४-जीजीडी-२०१५ या कारद्वारे चौघेही छत्रपती संभाजीनगर येथून मेहकरकडे जात होते.

या अपघातामध्ये चालक आफरोज खान हा गंभीर जखमी झालेला आहे. नागपूर कॉरिडॉरमध्ये चानेल क्रमांक ३०३ मध्ये हा अपघात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला. भरधाव वेगातील या कारचे मागील टायर फुटल्याने कार चालक आफरोज खानचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार साईड बॅरियरला धडकून कारमधील चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जोनकर व त्यांचे सहकारी ही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना त्वरेने मेहकर येथे उपचारासाठी हलविले. सोबतच अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात