शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Positive Story :  कॅन्सरग्रस्त आजोबांंनी केली कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 12:11 IST

Old man Beat Corona : ७० वर्षीय कॅन्सरग्रस्त आजोबांनीही कोरोनावर मात करीत सकारात्मक दृष्टिकोन व पथ्यपाणी पाळल्यास कोरोनाला सहज हरविता येते हे दाखवून दिले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रामुख्याने दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक असतो. मात्र लोणार येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या देऊळगाव वायसा येथील ७० वर्षीय कॅन्सरग्रस्त आजोबांनीही कोरोनावर मात करीत सकारात्मक दृष्टिकोन व पथ्यपाणी पाळल्यास कोरोनाला सहज हरविता येते हे दाखवून दिले आहे. २८ एप्रिल रोजी या आजोबांना कोविड केअर सेंटरमधून सुटी मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचाही आनंद द्विगुणित झाला.दरम्यान, लोणार येथील कोविड केअर सेंटरमधून आजपर्यंत १,६७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी ‘लवकर निदान, लवकर उपचार’ या पद्धतीला येथील डॉक्टरांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही येथे वाढत आहे. एकीकडे खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असताना तसेच महागडे इंजेक्शन व औषधी तसेच ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत. अशा स्थितीत लोणार येथील कोविड केअर सेंटर हे रुग्णांसाठी एक आशेचा किरण बनले आहे. या कोविड केंद्रावर कार्यरत डॉ़  भास्कर मापारी, डॉ़  अनिता नागरे, डॉ़  खोडके, डॉ़  सिरसाट, डॉ़   पूजा सरकटे या डॉक्टरांसह येथे कार्यरत स्टाफ सचिन मापारी, खंडागळे, सरदार, चेके, सुरडकर, सरकटे, शिंदे, गायकवाड यांच्या गेल्या वर्षभरातील कठोर मेहनतीमुळे तब्बल १६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़  यात उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये तालुक्यातील देऊळगाव वायसा येथील आसाराम तारे या कॅन्सरग्रस्त ७० वर्षीय आजोबांचाही समावेश आहे. २८ एप्रिल रोजीच त्यांना सुटी मिळाली. कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना दाखल करतेवेळी त्यांची अवस्था नाजूक होती. तारे यांच्यावर या कोविड केंद्रात कुठल्याही महागड्या औषधी किंवा इंजेक्शनचा वापर न करता केवळ औषधी गोळ्यांच्या आधारे उपचार करण्यात आले़.  यासोबतच तारे यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, इच्छाशक्तीचीही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना साथ मिळाली आणि तारे आजोबांनी कोरोनावर मात केली. ते ठणठणीत बरे होऊन घरी परतल्यानंतर घरच्यांचाही आनंद द्विगुणित झाला. आपल्या बरे होण्याचे श्रेय तारे आजोबांनी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर आणि तेथील स्टाफला दिले आहे. सोबतच महागड्या इलाजाच्या मागे न लागता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत सरकारी रुग्णालयातील सुविधांचा लाभ घेण्याचेही आजोबांनी सांगितले. दरम्यान, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोणार तालुक्यातील येवती येथील ७५ वर्षीय आजींनीही या केंद्रातच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

९२ वर्षीय आजाेबांनीही काेराेनाला हरविलेतालुक्यातील पळसखेड येथील ९२ वर्षे वयाचे आजोबा आणि आजीसुद्धा प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉक्टरांचे प्रयत्न या जोरावर कोरोनावर मात करून सुखरूप घरी गेले़  या सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर बरे झाल्यानंतर दिसणारे समाधान आम्हाला ऊर्जा देते़   त्यामुळे आम्ही अनंत अडचणी आणि त्रासात असूनही पुन्हा नव्या जोमाने रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज होतो, अशी भावना यावेळी कोविड केंद्राचे मुख्य व्यवस्थापक डॉ़  भास्कर मापारी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या