शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

ग्रा.पं.च्या दहा जागांकरिता पोटनिवडणूक

By admin | Updated: May 1, 2017 01:35 IST

नांदुरा- नांदुरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या दहा रिक्त जागांची पोटनिवडणूक होऊ घातली असून, येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे.

नांदुरा : सप्टेंबर १७ पर्यंत मुदती संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून, यासोबतच नांदुरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या दहा रिक्त जागांची पोटनिवडणूक होऊ घातली असून, येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे. सदर सात ग्रामपंचायतींकरिता आचारसंहिता लागू झाली आहे. तालुक्यातील हिंगणा भोटा येथे एसटी प्रवर्गाच्या राखीव तीन जागा रिक्त असून, पोटनिवडणुकीतही हा प्रवर्ग कायम आहे. त्यामुळे आताही उमेदवार राहण्याची शक्यता नाही. दादगाव येथे वार्ड क्र.३ मधील एसटी राखीव जागेकरिता प्रवर्गातील उमेदवार नसल्याने जागा रिक्त होती. यावेळी ही जागा सर्वसाधारण महिलाकरिता राखीव आहे. पलसोडा येथील वार्ड क्र.१ व २ एसटी राखीव असल्याने उमेदवार नव्हते म्हणून रिक्त आहे. यावेळीही एसटी राखीव प्रवर्गच आहे. सिरसोडी येथील वार्ड क्र.३ मध्ये एसटी राखीव जागा असल्याने उमेदवार नव्हता. यावेळी ही जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. मोमीनाबाद वार्ड क्र.२ मध्ये एसटी राखीव असल्याने रिक्त असलेली जागा यावेळीही एसटी राखीवच आहे. धानोरा (वि.) येथील योगीता संदीप गावंडे ह्या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक असून, ही जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. जिगाव येथील सुनंदाताई वसंतराव भोजने ह्या जि.प. सदस्य म्हणून निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक असून, ही जागा ओबीसी महिला राखीव आहे. उमेदवारी अर्ज भरणे ५ ते १२ मे, छाननी १५ मे, उमेदवारी मागे घेणे १७ मे, अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप १७ मे दुपारी ३ नंतर, मतदान २७ मे रोजी तर मतमोजणी २९ मे रोजी होणार आहे.