शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

प्रतीक्षा कापूस खरेदीची

By admin | Updated: November 6, 2014 00:20 IST

खासगी भाव तुटपुंजे : बुलडाणा येथे व्यापा-यांकडून ३२00 रुपयांनी कापूस खरेदी

बुलडाणा : राज्य शासनाच्या पणन महासंघाकडून कापूस एकाधिकार योजनेनुसार होणार्‍या कापूस खरेदीला अद्यापही मुहूर्त गवसला नाही. शासनाचा हमीभाव हा ४ हजार ३६0 रुपये एवढा आहे. मात्र, व्यापार्‍यांकडून सद्य:स्थितीत शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ३ हजार २00 ते ३६00 रुपये असा भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पणन महासंघाच्या वतीने सुरू होणार्‍या खरेदीची प्रतीक्षा आहे. सोयाबीन व कापूस हे दोनच प्रमुख नगदी पिके असून, यावर्षी या दोन पिकांवरच शे तकर्‍यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. सुरुवातीला पावसाने मारलेली दडी व परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे या दोन्ही पिकांना फटका बसला आहे. कापसाचे सरासरी एकरी उत्पादन घटले असून, उत्पादनाचा खर्चही भरून निघणार नाही असा बाजारभाव सध्या कापसाला आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेली खासगी कापूस खरेदी ही ३२00 ते ३६00 रु पयांपर्यंत असल्याचे शेतकर्‍यांना आर्थिक तोटा होत आहे. त्यामुळे शासनाने खरेदीची घोषणा जरी झाली तरीही बाजारपेठेत कापसाचे भाव वाढतात व सरासरी क्विं टलमागे ४00 रुपयांचा फायदा शेतकर्‍यांना होऊ शकतो. शासनाने लांब स्टेपलच्या कापसाला चार हजार रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार, याची बळीराजाला प्रतीक्षा आहे. शासनाने शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी कापसाला किमान सहा ते सात हजार रु पये हमी भाव देण्याची गरज आहे. यावर्षी पावसाने मारलेली दडी व परतीच्या पावसाचा फटका यामुळे उत्पादनात घट आली असल्याचे कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी सांगीतले. *जळगाव बाजार समितीचे सीसीआयला पत्र जळगाव जामोद तालुक्यात बागायती आणि कोरडवाहू कापसाचे उत्पादन हे सर्वाधिक आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांकडे कापूस घरी आला असून, पणन महासंघ व सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील यांनी सीसीआयकडे केली आहे.