शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सैलानी यात्रेसाठी राज्यभरातून सोडणार अडीचशेच्यावर बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:36 IST

बुलडाणा : हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेली सैलानी बाबा यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यासह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. विदर्भ, मराठवाडा, खांदेशसह राज्यातील विविध विभागातून यात्रेसाठी अडीचशेवर  विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.  कायम तोट्यात चाललेल्या एसटीसाठी हा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरणार आहे. 

ठळक मुद्देपरिवहन विभागाचे नियोजन तीन ठिकाणी राहणार बसस्थानक

सोहम घाडगे। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेली सैलानी बाबा यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यासह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. विदर्भ, मराठवाडा, खांदेशसह राज्यातील विविध विभागातून यात्रेसाठी अडीचशेवर  विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.  कायम तोट्यात चाललेल्या एसटीसाठी हा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरणार आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात दरवर्षी भव्य यात्रा भरते. राज्य व देशभरातील लाखो सर्वधर्मिय भाविक दर्शनासाठी दाखल होतात.  यंदा २६ फेब्रुवारी ते १0 मार्चदरम्यान ही यात्रा भरणार आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. सैलानी बाबा यात्रेसाठी देशभरातून येणार्‍या भाविकांची संख्या पाहता राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसगाड्यांचे नियोजन केले आहे. राज्यातील विविध आगारातून यात्रेसाठी बसेस सोडल्या जातील.

अशी राहील महामंडळाची बससेवाबुलडाणा विभाग १५0, औरंगाबाद ६0, अकोला ६0, यवतमाळ ४0, जालना ६0, अमरावती ४0 यासह अनुमतीप्राप्त अंदाजे १00 खासगी बसेस यात्रेसाठी दररोज ये-जा करतील. तसेच मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड विभागामधूनही दरवर्षी या यात्रेसाठी विशेष बसगाड्या पाठविल्या जातात.

तीन बसस्थानकांची सोयसैलानी यात्रेसाठी अहोरात्र वाहतूक सुरु असते. वेगवेगळ्या मार्गाने येणार्‍या बसेससाठी परिवहन विभागाकडून तीन बसस्थानकांची   व्यवस्था करण्यात आली आहे. चिखलीमार्गे येणार्‍या बसेसकरिता पिंपळगाव सराईकडील बाजूला बसस्थानक असेल. तर धाडमार्गे येणार्‍या गाड्यांसाठी ढासाळवाडी येथे बसस्थानकाची व्यवस्था केली आहे. औरंगाबाद, जालनाकडून येणार्‍या बसेससाठी भडगावकडील बाजूस बसस्थानकाची सोय करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा