शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

‘मानव विकास’च्या बस शोभेच्या वस्तू

By admin | Updated: July 10, 2014 01:33 IST

एसटी बसेस बंद : सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थिनींची हेळसांड

सिंदखेडराजा : मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेमध्ये येजा करण्यासाठी राज्यभर मुलींसाठी एसटी बसेसद्वारे व्यवस्था सुरु करण्यात आली. मात्र २६ जून रोजी शाळा उघडून सुद्धा अनेक विद्यार्थीनींना या सवलतीचा शिक्षण विभाग व शाळेच्या हलगर्जीपणामुळे फायदा घेता येत नसुन दररोज ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तर काही ठिकाणी मानव विकास मिशनच्या एस.टी. बसेस सुरु करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे.बाहेरगावी शिक्षण घेणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाणे आणि त्यांच्या गावाला परतने सोयीचे व्हावे या उद्देशाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून तालुक्यात एस.टी. बसेस सुरु करण्यात आल्या. राज्य परिवहन मंडळाकडून या बसेस चालविल्या जातात. सिंदखेडराजा तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत ५ बसेस आहेत. त्याही आज १५ दिवस उलटुनही सुरु करण्यात आल्या नव्हत्या. ७ जुलैपासून दोन बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी सिंदखेडराजा ते गारखेड तांडा या गाडीत ६५ विद्यार्थिनी, दुसरबीड ते बोरखेडी गंडे या गाडीत ११0 मुली, साखरखेर्डा ते शेंदुर्जन ८२ मुली, दुसरबीड ते केशवशिवणी ८६ मुली प्रवास करीत होत्या. मानव विकासच्या नियमानुसार एका रुटवर ८ ते १२ मध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनीची संख्या १२0 पाहिजे. त्यातच गेल्यावर्षी सिंदखेडराजा शिक्षण विभागांतर्गत मुलींसाठी ६६६ सायकलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी त्या विद्यार्थीनींना मानव विकासच्या बसचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत फक्त एमईएस हायस्कूल साखरखेर्डा १0६ पासेस, जिजामाता विद्यालय साखरखेर्डा ३८ पासेस, जिजामाता विद्यालय सिंदखेडराजा ५१ पासेस देण्यात आल्याचे सिंदखेडराजा बसस्थानकातून कळाले. म्हणजे तालु क्यातील सर्व विद्यार्थीनी आर्थिक भुर्दंड सहन करीत आहेत. त्यासाठी महामंडळ किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्याबाबत गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसत आहे. मानव विकास मिशनकडून विद्यार्थीनींची समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावित, अशी अपेक्षा विद्या र्थीनी व पालकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान मानव विकासच्या पासेस बसस्थानकात उपलब्ध असून, शाळेकडून याद्या आल्या नाही. याद्या आल्यास पासेस त्वरीत उपलब्ध होऊ शक तील, असे जि.टी.गायकवाड, येथील पास वितरक यांनी कळवले. तर तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी आर.बी.मखमल यांनीअद्यापपर्यंत शाळेकडून येजा करणार्‍या विद्यार्थीनीच्या याद्या उपलब्ध झाल्या नसुन सर्व शाळेच्या याद्या उपलब्ध झाल्यानंतर गाड्या सोडण्यात येतील, असे सांगीतले.