शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात भर दिवसा घरफोडी; २ लाख ४१ हजाराचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:16 IST

Crime News : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा समोरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील चिखली रोडलगत भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना २० जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान घडली. यामध्ये २ लाख ४१ हजार रुपयांचा माल लंपास झाला आहे. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळविहीर येथील हाजी मलंग दर्गासमोर शिक्षक विकास पांडुरंग बाहेकर (वय ४८) यांचे घर आहे. ते २० जून रोजी सकाळी ११ वाजता मित्राच्या मुलीचा साखरपुडा असल्याने घर बंद करून बाहेर गेले होते. दरम्यान, घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा समोरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात असलेल्या सोन्याच्या ४० ग्रॅमच्या दोन बांगड्या, इतर सोन्या, चांदीचे दागीने, रोख ५५ हजार रुपये असा एकूण २ लाख ४१ हजार रुपयांचा माल लंपास केला. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजता विकास बाहेकर यांचा मुलगा घरी आला असता, घरात चोरी झाल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चोरीच्या घटनेमुळे भीतीरात्रीच्या वेळी शहरात अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही घटनांचा तपास लागला, तर काही चोरटे आजही बाहेरच फिरत आहेत. परंतू वर्दळीच्या ठिकाणी आणि ऐन दुपारच्या वेळी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनीही आता दिवसाची गस्त वाढविणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा