शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

महिनाभरच पुरेल चारा!

By admin | Updated: April 6, 2016 00:22 IST

जनावरांची चा-याकरिता भटकंती; पाण्याबरोबर चाराटंचाईचे सावट.

नाना हिवराळे / खामगाव(बुलडाणा) अत्यल्प पावसामुळे नापिकी होऊन शेतकर्‍याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असताना आता जनावरांच्या चाराटंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे. खामगाव तालुक्यात एप्रिलअखेर उपलब्ध चारा पुरणार असल्याचे नियोजन असून, येत्या जुलैपर्यंत सुमारे २९ हजार मेट्रिक टन चार्‍याची तूट भासणार आहे. परिणामी तालुक्यात गुरांच्या छावण्या तसेच चारा डेपो उघडण्याची आवश्यकता असल्याची चिन्हे दिसत आहेत.खामगाव तालुक्यात एकूण १४८ गावे असून, १३२ आबाद तर १६ गावे उजाड आहेत. १९ वी पंचवार्षिक पशुगणना २0१२ नुसार तालुक्यात ७0 हजार ४७२ मोठी व १५ हजार ९२६ लहाने जनावरे व शेळ्या, मेंढय़ा ९३ हजार ८३९ असे एकूण १ लाख ८0 हजार २१७ जनावरांची संख्या आहे. टंचाई परिस्थिती सर्वसाधारण जीवनमान जगण्यासाठी मोठय़ा जनावरांना दररोज ६ किलो तर लहान जनावरांना ३ किलो चार्‍याची आवश्यकता असते. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख २२ हजार ३ हेक्टर असून, यापैकी ७४ हजार ५0१ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखालील तर १९ हजार ५५0 हेक्टर क्षेत्र रब्बी पिकाखालील असे एकूण ९४ हजार ५१ हेक्टर क्षेत्र आहे. सन २0१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामातील अंतिम पेरणी अहवालानुसार खरीप व रब्बी हंगामातून १ लाख ८0 हजार ८७८ मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे; परंतु अपुर्‍या पावसाची परिस्थिती लक्षात घेता खरीप व रब्बी हंगामातून ३0 टक्के चारा उत्पादनात घट झाल्याने १ लाख २६ हजार ६२२ मेट्रिक टन चारा उपलब्ध राहील. बांध, पडीक जमीन, कुरणे, वनक्षेत्र मिळून वैरणीचे अंदाजे १५ हजार ९७५ मेट्रीक टन उत्पादन अपेक्षित असते.तालुक्यात १ लाख ८0 हजार २१७ पशुधनासाठी दररोज ५२६ मेट्रिक टन चारा लागत असून, एक महिन्यासाठी तो १५ हजार ८0७ मेट्रिक टन चारा लागतो. माहे ऑगस्ट २0१५ ते जुलै २0१६ या कालावधीत १ लाख ८९ हजार ६८५ मेट्रिक टनची गरज असताना २९ हजार मेट्रिक टन चार्‍याची तूट दिसून येत आहे. यामुळे येत्या काही दिवसात जनावरांना चारा पुरविणे कठीण होणार आहे. अगोदरच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच चार्‍याची तीव्रता भासणार असल्याने जनावरे कशी जगतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मे पासून चार्‍याची टंचाई भासणार असल्याचा अहवाल पंचायत समितीला पशुसंवर्धन विभागाने वरिष्ठांकडे पाठविला आहे.