शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार; रानडुकराने शेतकऱ्याला केले जखमी

By विवेक चांदुरकर | Updated: December 4, 2023 13:10 IST

वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

खामगाव : शेतात रानडुकराने अचानक हल्ला केल्याने शेतकरी जखमी होऊन त्यांचा हात मोडल्याची घटना ३ डिसेंबर रोजी घडली. तसेच चिचपूर परिसरात बिबट्याने बैलाची शिकार केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंप्री गवळी येथील रहिवासी किशोर होगे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दरम्यान तुरीत लपून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. यामुळे होगे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताचा असून हात फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर खामगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जंगली डुकरांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

चिचपूर गावाच्या चहुबाजुने जंगल आहे. त्यामुळे राही, हरिण, जंगली डुक्कर, अस्वल या प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. रोही, हरिण, जंगली डुक्कर अनेकदा पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी रात्रभर शेतात जागरण करतात. गावातील शेतकरी विनायक पोफळे यांचा बैल घरी न आल्याने त्यांनी शोध घेतला गावालत असलेल्या कदम यांच्या शेतात बिबट्याने शिकार केल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी सुद्धा गावातील शेतकरी प्रभाकर जाधव, उकर्डा शिंदे, दयाराम कदम, सिद्धेश्वर सरजने यांच्या जनावरांची बिबट्याने शिकार केली आहे.गावातील जनावरांची वन्य प्राणी शिकार करीत असल्याने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. तसेच शेतांना कुंपण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा