शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे ‘सस्पेन्स’ कायम!

By admin | Updated: March 21, 2017 02:02 IST

भाजप- राष्ट्रवादीत एकमत; सत्तेचा समान वाटाघाटीचा फॉर्म्युला, आज होणार निवड

अनिल गवई खामगाव, दि. २0- जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपला परंपरागत राजकीय शत्रु काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी त्यांच्याच समविचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जुळून घेतले; मात्र सत्तेतील ह्यवाटाह्ण देण्यावरून रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद व एक सभापतीपद देण्याचे निश्‍चित झाल्याचे समजते. जिल्हा परिषदेवर भाजपने प्रथमच सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षातील सर्वच नेत्यांचे कमी-अधिक प्रमाणात असलेले योगदान लक्षात घेत सत्तेतील भागिदारीमध्ये सर्वांना समान वाटा देण्याचा फॉर्म्युला तयार केला असल्याचे समजते. पक्षाचे नेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. फॉर्म्युलानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सव्वा-सव्वा वर्षांचे ठरले असून, अध्यक्षपदाचा पहिला मान फुंडकरांच्या निकटवर्तीय जयश्री टिकार यांना मिळणार असल्याचे समजते.बुलडाणा जिल्ह्याचे ह्यमिनी मंत्रालयह्ण असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, परंपरागत मित्र असलेल्या शिवसेनेशी काडीमोड घेत, जिल्हा परिषदेत सत्तेचा नवीन फॉर्म्युला भाजपने अस्तित्वात आणला आहे. दरम्यान, सत्ता स्थापन्याबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत वेगाने घडलेल्या घडामोडीत, भाजपचा अध्यक्ष, तीन सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदासह एक सभापतीपद देण्यावर नेत्यांचे एकमत झाले. तथापि, जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागेल, याबाबतचा ह्यसस्पेन्सह्ण कायम असला तरी, समान वाटाघाटीच्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांच्या सत्ता काळाचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन दावेदारी निश्‍चित करण्यात आली. यामध्ये सत्ता काळातील पहिल्या सव्वा वर्षांची संधी खामगाव विधानसभा मतदार संघाला देण्याचे ठरले.त्यानंतर दुसरे सव्वा वर्ष घाटावर, अडीच वर्षानंतरची पहिली टर्म जळगाव जामोद तालुक्याला, तर शेवटची सव्वा वर्षांची टर्म मलकापूर तालुक्याला देण्याचे ठरले आहे. सत्तेचा समान 'वाटाघाटी' फॉम्र्युला!जिल्हा परिषदेच्या इतिहासात पन्नास वर्षांनंतर प्रथमच बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आले आहे. जिल्हा परिषदेवर ह्यपरिवर्तनाह्णचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपच्या सर्व नेत्यांचे कमी-अधिक प्रमाणात योगदान आहे. ही वस्तुस्थिती असली तरी, ह्यनेते सारे एक होऊ, सत्तेचा वाटा सर्वांना मिळवून देऊह्ण या सूत्रानुसार, जिल्हा परिषदेच्या सत्तेतील वाट्याचे विकेंद्रीकरण करीत समान वाटप करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासोबतच सभापतीपदासाठीही समान वाटपाचाच फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.1 भाऊसाहेब फुंडकरबुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा परिषदेच्या सत्तेत पहिले अध्यक्षपद आपल्या कार्यक्षेत्रातील युवा उमेदवाराला देण्यासाठी प्रयत्नशील. सोबतच सर्वांना समान न्याय तत्त्वानुसार सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पुढाकार. 2 डॉ. राजेंद्र शिंगणेजिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून डॉ. शिंगणे यांची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीच्या सर्मथनाच्या मोबदल्यात सत्ता काळातील उपाध्यक्षपदासह एक सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. 3 आ. संजय कुटेजिल्हा परिषदेच्या पाच वर्षांतील सत्ता काळातील सव्वा वर्षांचा कार्यकाळ आपल्या सर्मथकांकडे खेचण्यासाठी यशस्वी. या पार्श्‍वभूमीवर अडीच वर्षानंतरच्या आरक्षणानंतर घाटाखालील जळगाव जामोदमधील जि. प. अध्यक्ष करण्यास पुढाकार. 4 आ. चैनसुख संचेतीजि.प. अध्यक्षपदाची शेवटची सव्वा वर्षांची टर्म मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्याला (आपल्या सर्मथकाला) मिळवून देण्यात यशस्वी. एक सभापतीपदही मलकापूर संघात जाणार असल्याचे संकेत आहेत.जि.प.तील पक्षीय बलाबलभाजप-       २४शिवसेना-    १0काँग्रेस-        १३राष्ट्रवादी-    0८भारिप-        0२अपक्ष         -0३