शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा वैध मापन विभागास मिळाला ३0 लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:21 IST

बुलडाणा : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये वैध मापन विभागाने वजन मापे प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून ३0 लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. दरम्यान, वजनात फेरफार केल्या प्रकरणांसह अन्य प्रकरणांमध्ये तब्बल सात लाख ९0 हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

ठळक मुद्देवजन मापे प्रमाणीकरण मोहीम अनियमितता करणार्‍यांना दंड!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये वैध मापन विभागाने वजन मापे प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून ३0 लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. दरम्यान, वजनात फेरफार केल्या प्रकरणांसह अन्य प्रकरणांमध्ये तब्बल सात लाख ९0 हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण या अंतर्गत वजन माप कायदा १९७६ मध्ये लागू झाला. १९७७ मध्ये त्यात काही वस्तूंचा अंतर्भाव केल्या गेला. २00९, २0११, २0१३ मध्ये काही कायदेशीर तरतुदी व नियमांची भर  त्यात घातल्या गेली. त्या अनुषंगाने वजन मापाची दशमान पद्धती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेली पद्धत आहे. या कायद्यांचा आधार घेत बुलडाणा येथील सहायक नियंत्रक वैध मापनशास्त्र विभागाने जिल्ह्यात कारवाई करत हा महसूल आणि दंड वसूल केला आहे.बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १४ हजार नोंदणीकृत प्रतिष्ठाणे आहेत. यापैकी तीन हजारांच्या आसपास किराणा दुकानांची संख्या असून, इतर प्रतिष्ठाणे अडीच हजारांच्या आसपास आहे, तर उपाहारगृहांची संख्या एक हजारच्या घरात आहे. या सर्व प्रतिष्ठाणांच्या तपासणीदरम्यान विभागास हा महसूल मिळाला आहे. वजन मापे प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत विभागाने ३0 लाख ४५ हजार रुपये फी स्वरूपात महसूल मिळवला आहे.

२७१ प्रकरणात अनियमिततामापात पाप केल्याप्रकरणी तथा निर्धारित किमतीपेक्षा जादा दराने वस्तूंची विक्री करणे, वस्तुवर उत्पादनाची किंमत, उत्पादन दिनांक न लिहिणे यांसह अन्य काही कारणांसाठीही वैध मापन विभागाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली असून, अशी २७१ प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ग्राहक संरक्षणासंदर्भातील बैठकीत ही माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सात लाख ९0 हजार रुपयांचा दंड अशा प्रकरणात वसूल करण्यात आल्याची माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक कमलाकर पाटील यांनी दिली. दरम्यान, एका प्रकरणात  न्यायालयाने एकास ६0 हजार रुपयांचा दंडही ठोठावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले; मात्र त्यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTaxकर