शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : रिक्त पदांमुळे पाणी पुरवठा योजनेची कामे खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:39 IST

बुलडाणा : अपुर्‍या कर्मचार्‍यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम  विभागाचा कारभार  सुरू आहे. जिल्ह्यातील विभागीय व उपविभागीय  कार्यालयातील मंजूर ८0 पदांपैकी ४५  पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर  कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पाणी पुरवठा योजनांची  कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअपुर्‍या कर्मचार्‍यांवर मजीप्राचा गाडा

सोहम घाडगे। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अपुर्‍या कर्मचार्‍यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम  विभागाचा कारभार  सुरू आहे. जिल्ह्यातील विभागीय व उपविभागीय  कार्यालयातील मंजूर ८0 पदांपैकी ४५  पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर  कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पाणी पुरवठा योजनांची  कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम हा पाणी पुरवठा योजनांबाबतीत  महत्त्वाचा विभाग आहे. बुलडाणा विभागीय कार्यालयांतर्गत बुलडाणा,  खामगाव, जळगाव जामोद व चिखली हे उपविभाग येतात. पाइपलाइन  बांधकाम करून संबंधित यंत्रणेकडे सुपुर्द करण्याचे काम या  विभागामार्फत करण्यात येते. कुशल मनुष्यबळाच्या जोरावर आजपर्यंत  अनेक कामे या विभागाने पूर्ण केलेली आहेत. सद्यस्थितीत पूर्वीच्या  तुलनेने कमी कामे असली तरी अनेक महत्त्वाच्या योजनांची कामे सुरू  आहेत. योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी अभियंता व इतर अधिकारी,  कर्मचार्‍यांची टीम असावी लागते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून  बुलडाणा विभागीय कार्यालय व अंतर्गत उपविभागीय कार्यालयातील ८0  पदे मंजूर असताना त्यापैकी ४५ पदे रिक्त आहेत. 

रखडलेल्या योजनादेऊळघाट धाड पाच गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मुदत २0१४  पर्यंत होती; मात्र काम रखडले असून, आता ३१ मार्चपर्यंंत मुदत  वाढवण्यात आली आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणे गव्हाड १३ गावे  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, शेगाव तालुक्यातील तिवान १0 गावे  पाणी पुरवठा योजना, बुलडाणा शहर व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा  योजना, मोताळा तालुक्यातील रोहिणखेड १२ गावे प्रादेशिक पाणी  पुरवठा योजना, जळगाव जामोद १४0 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा  योजनेची कामेही अजून पूर्ण झालेली नाहीत. 

४५ पदे रिक्तमजीप्रामध्ये शाखा अभियंता, सहायक अभियंत्यांची २२ पैकी १२ पदे  रिक्त आहेत. तर कनिष्ठ लिपिकाची १३ पैकी ११, शिपाई १२ पैकी      ९, वाहनचालक  ५ पैकी ४, स्थ. सहायक अभियंता २, अनुरेखक २  तर शाखा अभियंता या, वरिष्ठ लिपिक, सहा. अनुरेखक, सहा. भांडार पाल व चौकीदाराचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूकbuldhanaबुलडाणा