शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शौचालये सापडेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:15 IST

खामगाव :  मार्च अखेर जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी, पाणी व स्वच्छता विभागातर्फे उभारण्यात आलेली शौचालये सापडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या शौचालयांचे फोटो अक्षांश, रेखांशसह अपलोड करण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील तब्बल १४५ गावांतील फोटो अपलोड करण्याची समस्या आता निर्माण झाली आहे.  परिणामी, हा गुंता सोडवावा तरी कसा? असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान हगणदरीमुक्त जिल्ह्यात फोटो अपलोड करण्याचा पेच

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  मार्च अखेर जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी, पाणी व स्वच्छता विभागातर्फे उभारण्यात आलेली शौचालये सापडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या शौचालयांचे फोटो अक्षांश, रेखांशसह अपलोड करण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील तब्बल १४५ गावांतील फोटो अपलोड करण्याची समस्या आता निर्माण झाली आहे.  परिणामी, हा गुंता सोडवावा तरी कसा? असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण राज्यात २० जिल्हे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आहेत.  यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात शौचालय बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयांचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान,  बुलडाणा जिल्हा जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या शौचालयांची छायाचित्रे साफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात जिल्हा पिछाडीवर असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.  यामध्ये जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर आणि शेगाव या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित  दहा तालुक्यांपैकी संग्रामपूर, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांच्या तुलनेत  ७ तालुक्यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे दिसून येते. तथापि, स्वच्छ  भारत मिशन कक्षातील कंत्राटी कर्मचाºयांना झालेल्या मारहाणीच्या पृष्ठभूमीवर शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अनेक ठिकाणी अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे अनेक गावात प्रत्यक्ष शौचालय बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून, फोटो काढणाºया कर्मचाºयांना मारहाणीच्या घटना या  त्यातूनच समोर येत असल्याची चर्चा आहे, तर अनेक गावात शौचालयेच दिसून येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे.

फोटो अपलोडिंगमध्ये तांत्रिक पेच!बुलडाणा जिल्ह्यातील १२७२ पैकी तब्बल १४५ गावामधील  शौचालयांची छायाचित्रे अद्याप अपलोड झालेली नाहीत. त्यातच शौचालयांचे फोटो काढण्यासाठी जाणाºया कंत्राटी कर्मचाºयांना ग्रामस्थांकडून मारहाण झाल्याची घटना पाहता, या प्रक्रीयेमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तर  दुसरीकडे शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, तालुक्यातील कर्मचाºयांना घाटावरील तालुक्यातील शौचालयांची कामे देवू नये असा पवित्रा कर्मचाºयांनी घेतला आहे. शौचायल बांधकामाच्या फोटो अपलोडींगमध्ये तांत्रिक पेच निर्माण झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा