शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:47 IST

बुलडाणा: सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीचा उतारा ऑनलाइन मिळावा असा जिल्हा प्रशासनाचा उद्देश पूर्ण झाला असून, ऑनलाइन सातबाराचे १00 टक्के काम पूर्ण करून बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देऑनलाइन सातबाराचे १00 टक्के काम पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीचा उतारा ऑनलाइन मिळावा असा जिल्हा प्रशासनाचा उद्देश पूर्ण झाला असून, ऑनलाइन सातबाराचे १00 टक्के काम पूर्ण करून बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.शासनाच्या सूचनेनुसार बुलडाणा तालुक्यात ऑनलाइन सातबाराचे काम २0 जुलै २0१५ रोजी सुरू करण्यात आले. यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ मंडळ अधिकारी, ४0 तलाठी यांनी परिश्रम घेऊन ३0 सप्टेंबर २0१७ रोजी काम पूर्ण करण्यात आले. यावेळी सातबारा संगणकीरणाचे काम १00 टक्के पूर्ण करून बुलडाणा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हस्तलिखित सात-बारा व संगणकीकृत सात-बारा तंतोतंत जुळविण्यासाठी जमावबंदी आयुक्तांकडून एडीट मोड्युल उपलब्ध करून दिले होते. या मोड्युलद्वारे शेतकर्‍यांना डिजिटल स्वाक्षरीसह सात-बारा ऑनलाइन पद्धतीने मिळू लागले आहेत. तसेच नागरिकांना सुलभ रीतीने संगणकीकृत सत्यप्रती व इतर सेवा प्राप्त करून घेता याव्यात, यासाठी तालुका व मंडल मुख्यालयात की ऑस्क मशीन बसविण्यात आले आहे. पूर्वी शेतकर्‍यांना सात-बारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत होते; परंतु सात बारा ऑनलाइन मिळविता यावा यासाठी राज्य सरकारने आपले सरकार पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे डिजिटल सही असलेला सात-बारा उतारा दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तलाठी कार्यालयात जाण्याचा त्रास कमी झाला असून, दिलासा मिळाला आहे.