शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘रुर्बन’चा ‘सीजीएफ’ आराखडा ३० कोटी रुपयांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:59 IST

३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दशकात ग्रामीण लोकसंख्येत १२ टक्के वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरी तथा ग्रामीण भागातील विकासाचा असमतोल दुर करण्यासाठी देशात राबविण्यात येणाऱ्या रुरअर्बन अभियानातर्गंत निवड झाल्या सुलतानपूर जिल्हा परिषद गटाच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासासाठी बनविण्यात आलेल्या ३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली असून लवकरच केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी याचा डिपीआर पाठविण्यात येणार आहे.दरम्यान, सुलतानपूर जिल्हा परिषद गटातील १३ गावामध्ये आतापर्र्यंत २७ कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून ही कामे करण्यात आली आहेत. दरम्यान, ज्या विकास कामांना कुठल्याही अस्तित्वात असलेल्या योजनेतून निधी उपलब्ध होत नाही, अशा कामांसाठी श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन अभियानातंर्गत क्रिटीकल गॅप फंडींग (उणिवा निवारण निधी) अंतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांचा वकास आराखडा तयार करून त्यास राज्य व केंद्राची मान्यता घेतून पायाभूत विकासाची कामे करण्यावर भर दिला जात आहे. त्यातंर्गतच सुलतानपूर जिल्हा परिषद गटातील १३ गावांच्या विकासाठी ३० कोटी रुपयांचा हा आराखडा बनविण्यात आला आहे.त्यास राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३० डिसेंबर रोजीच मान्यता दिली आहे. मात्र त्यात काही सुधारणा सुचविल्यामुळे अद्याप केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी हा डिपीआर पाठविण्यात आलेला नाही. त्यात सुधारणा करून तो पाठविण्यात येणार आहे.

सर्जिक कॉटन युनीट प्रस्तावितनव्या डिपीआरनुसार सुलतानपूर येथे सर्जिकल कॉटन निर्मितीसाठी एक युनीट प्रस्तावित करण्यात आले आहे. सोबतच अ‍ॅग्रो मॉल प्रस्तावीत असून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती या गटातील १३ गावात कशी करता येईल, याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, अस्तित्वात असेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रीकरण करून या गटात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जवळपास १२२ कोटी रुपयांचा कन्वहर्जन आराखडा आहे.

दोन मार्चला मुंबईत बैठकयेत्या दोन मार्च रोजी सीजीएफ अंतर्गतच्या ३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासंदर्भात ग्रामविकास विभागच्या वतीने मुंबईत बांधकाम भवनामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात येत असून रुरअर्बन योजनेतंर्गत समाविष्ठ असलेल्या गाव समुहाच्या पायाभूत विकासासाठी आणखी काय करता येऊ शकते, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा