शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: खरिपासाठी २९० कोटींच्या कर्जाचे होणार पुनर्गठन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:26 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी घाटाखालील सात तालुक्यात महसूल व वन विभागाच्या प्राप्त निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी दुष्काळ जाहीर केला आहे. या सातही तालुक्यातील ४४ मंडळांमध्ये दुष्काळी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केले आहे. परिणामी दुष्काळी स्थितीत आठ सवलती घाटाखालील तालुक्यांतील ७४८ गावांना मिळणार असून,  ३१ हजार ५१६ शेतकºयांच्या २९० कोटी रुपयांच्या कर्ज पुनर्गठनाचा मार्ग पुढील वर्षासाठी मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात तालुक्यांत दुष्काळ जाहीर उपाययोजना करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी घाटाखालील सात तालुक्यात महसूल व वन विभागाच्या प्राप्त निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी दुष्काळ जाहीर केला आहे. या सातही तालुक्यातील ४४ मंडळांमध्ये दुष्काळी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केले आहे. परिणामी दुष्काळी स्थितीत आठ सवलती घाटाखालील तालुक्यांतील ७४८ गावांना मिळणार असून,  ३१ हजार ५१६ शेतक-यांच्या २९० कोटी रुपयांच्या कर्ज पुनर्गठनाचा मार्ग पुढील वर्षासाठी मोकळा झाला आहे.दरम्यान, या गावात दुष्काळ जाहीर केल्याने जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शेतक-यांपैकी साडेतीन लाख शेतक-यांचा सुमारे १८ लाखांचा सामान्य जमीन महसूल माफ होणार आहे. सोबतच उर्वरित दीड लाख शेतक-यांचाही वाढीव जमीन महसूलही माफ झाला आहे. दहा हेक्टर मर्यादेत तो माफ होणार आहे. सोबतच दहावी, बारावीची परीक्षा देणाºया घाटाखालील सात तालुक्यातील ३४ हजार १६९ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ होणार आहे. या व्यतिरिक्त शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली असून, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट यामुळे शेतक-यांना मिळणार आहे. सोबतच रोजगार हमी योजनेवरील कामांच्या निकषातही काही ठळक बदल करण्यात येऊन यावर काम करणाºया मजुरांना त्याचा लाभ होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना लिखित स्वरूपात पत्रे पाठवून आनुषंगिक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील ४४ मंडळांमध्ये खरीप हंगामाच्या अंतिम पैसेवारीच्या आधारावर ७४८ गावात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यापैकी ३७ मंडळे ही घाटाखालील तालुक्यातील असून, सात मंडळे ही घाटावरील तालुक्यात मोडणाºया मात्र प्रत्यक्षात घाटाखाली असलेल्या मोताळा तालुक्यातील आहे. मोताळा तालुका हा तसा राज्य शासनाच्या दृष्टीने राज्यातील प्रमुख अवर्षणप्रवण तालुक्यापैकी एक आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील संग्रामपूर, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, खामगाव आणि घाटावरील तालुक्यांत मोडणाºया मोताळा या सात तालुक्यात जिल्हा प्रशासनास प्रामुख्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. घाटावरील तालुक्यात मात्र दुष्काळ नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

यंत्रणेचा काथ्याकूट सुरू! जिल्हाधिकारी यांनी तातडीच्या पत्रानुसार जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय, तहसीलदार, पालिका, रोजगार हमी योजना, पाणीटंचाई आणि आपत्ती विभागांना यासंदर्भात पत्रे पाठवून आनुषंगिक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, सहकार विभागांनाही पत्रे पाठविण्यात आली असून, या संपूर्ण यंत्रणा दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने माहिती जुळवाजुळव व आकडेमोडींचा काथ्याकूट सध्या करीत आहेत.

३१ हजार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन! बुलडाणा जिल्ह्यात खरिपाच्या हंगामात ३१ हजार ५१६ शेतकºयांना २९० कोटींचा १७-१८ या वर्षासाठी कर्जपुरवठा बँकांनी केला होता. त्या शेतक-यांच्या २०१८-१९ या वर्षासाठीच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा मार्ग जिल्हाधिकारी यांनी सात तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याच्या पृष्ठभूमीवर मोकळा झाला आहे. त्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेनेही हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास २९० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करावे लागले, असे जिल्हा अग्रणी बँकेचे पी. एन. श्रोते यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. त्यानुषंगाने लवकरच धोरण ठरणार असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा