शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana : तिसरी लाट रोखण्यासाठी पूर्वतयारी, ३५० बेड वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 11:30 IST

Buldhana NEws : जिल्ह्यात ३५० बेड वाढविण्यात आले असून, येत्या काळात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना संसर्गाची तिसरी लाट जुलै ते सप्टेंबर दरम्यान येण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, प्राथमिक स्तरावर वर्तमान स्थितीत जिल्ह्यात ३५० बेड वाढविण्यात आले असून, येत्या काळात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. सोबतच ऑक्सिजन बाबतही जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांसाठी ४,७१६ बेड उपलब्ध असून जिल्ह्यातील खासगी व शासकीय अशा ९४ रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये ४२६ आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनचे १५४३ बेड आहेत. यासोबतच नियमितस्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व महसूल यंत्रणेची बैठक घेण्यात येत आहे. तसेच तालुकानिहाय पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासंदर्भाने लवकरच अन्न व अैाषध प्रशासन मंत्री जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेऊन त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात अैाषधीचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता विचारात घेता आरोग्य विभाग बेड वाढविण्यासोबतच, ७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणी, अैाषधीसाठा तसेच अतिरिक्त ऑक्सिजन बेड वाढविण्यावर भर देत आहे. तूर्तास ३५० बेडचे प्राथमिक स्वरुपात नियोजन करण्यात आले असून येत्या काळात त्यात आणखी वाढ करण्याचे प्रयोजन आहे.- प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या