शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: बियाणांसाठी खामगावात शेतकऱ्यांची लूट! कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस

By अनिल गवई | Updated: May 31, 2023 23:49 IST

Buldhana: ठराविक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस  कृषी विभागाकडून करण्यात आली.

- अनिल गवईखामगाव : ठराविक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस  कृषी विभागाकडून करण्यात आली. त्वरित बियाणांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचा भंडाफोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने केला. त्यानंतर कृषी विभागात एकच तारांबळ उडाली. कृषी अधिकाऱ्यांनी धडक देत उपरोक्त कारवाई केली.

खामगाव शहरातील सरकी लाइन भागातील अंकुर कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उजेडात आला. बियाणासाठी शेतकऱ्यांकडून प्रतीबॅग ३६०० रुपयांऐवजी ६०० रुपये अतिरिक्त आणि हमालीची किंमत अधिक घेतल्या जात असल्याचे उघडकीस आले.या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रावर धडक दिली. संतप्त शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वीच कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तक्रारदार शेतकरी पिंटू लोखडकार, रा. नागापूर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा केली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संबंधित कृषी केंद्र आणि गोदामातील बियाणांच्या साठ्याची मोजणी सुरू केली.

पंचनामा करण्यात आला. त्यानंतर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली.  उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे,  तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री देसले, कृषी पर्यवेक्षक विलास परिहार, कृषी सहायक नितीन कोळी यांनी ही कारवाई केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.

गोदामाची तपासणीशेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून संबंधित कृषी केंद्रासह कृषी केंद्राच्या अखत्यारितील गोदामाचीही तपासणी करण्यात आली. तत्काळ परवाना निलंबित करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. मात्र, नियमानुसार चौकशीच्या स्वरूपातून कारवाई केल्या जात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शेतकरी शांत झाले.

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा