शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची शिगणेंवर ७६ हजारांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 14:57 IST

Buldhana Lok Sabha Election Results 2019

बुलडाणा: गत विस वषार्पासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात यंदा दुहेरी लढत झाली. वचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार यांनीही या निवडणुकीत चांगली टक्कर दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून बुलडाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी राजेंद्र शिंगणे यांना ७६५७८ मतांनी मागे टाकले आहे. जाधव यांना २९३४०७ मतं मिळाली असून, राजेंद्र शिंगणे यांच्या पारड्यात २१६८२९ मतं पडली आहेत.१९९६ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने १९९६ मध्ये प्रथमच विजय मिळविल्यानंतर काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. १९९८ मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला येथे यश मिळविता आले नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. मात्र त्यांना येथे अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. मतविभाजनाचा युतीच्या उमेदवारांनी येथे सातत्याने फायदा घेतला आहे. २०१९ च्या लढतीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे तब्बल दहा वषार्नंतर आमने सामने आहेत. २००९ मध्ये डॉ. शिंगणेंचा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचेच कृष्णराव इंगळे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव हे दुसर्यांदा खासदार झाले होते. त्यामुळे यंदा १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ मधील जुने खेळाडू नव्याने डाव टाकत आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे जुन्या खेळाडूंच्या नव्या डावपेचात यंदा कोण बाजी मारते याबाबत उत्सूकता आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचीही बुलडाणा लोकसभेतील ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता सर्वसामान्यांना लागली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील युती विरुद्ध आघाडीच्या लढतीचा निकाल जिल्ह्याचे येत्या दहा ते १५ वषार्तील राजकीय ध्रुविकरण स्पष्ट करणारा ठरणार आहे.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.५३ टक्के मतदान झालयं. यात ११ लाख १७ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी ५ लाख ९ हजार १४५ मते घेत विजय साकारला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांना ३ लाख ४९ हजार ५६६ मते मिळाली होती.

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPrataprao Jadhavप्रतावराव जाधवShiv Senaशिवसेना