शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांना १ लाख २२ हजार मतांची निर्णायक आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:02 IST

Buldhana Lok Sabha Election Results 2019

ठळक मुद्दे प्रतापराव जाधव यांना ४ लाख ९३ हजार ६ मते मिळाली आहेत.डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ७० हजार ५८५ मते मिळाली आहेत. बळीराम सिरस्कार यांना १ लाख ६३ हजार ३८६ मते मिळाली आहेत.

बुलडाणा: गत विस वषार्पासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. १९ व्या फेरीअखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिंगणे यांच्यावर १ लाख २२ हजार ३२१ मतांची निर्णायक आघाडी घेतल्याने, ते यावेळी खासदारकीची हॅटट्रीक साधण्याच्या उंबरठ्यावर आहेत. प्रतापराव जाधव यांना ४ लाख ९३ हजार ६ मते मिळाली असून, शिंगणे यांना ३ लाख ७० हजार ५८५ मते मिळाली आहेत. वंचित बहूजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना १ लाख ६३ हजार ३८६ मते मिळाली आहेत., राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात यंदा दुहेरी लढत झाली. वचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार यांनीही या निवडणुकीत चांगली टक्कर दिली आहे.१९९६ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने १९९६ मध्ये प्रथमच विजय मिळविल्यानंतर काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. १९९८ मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला येथे यश मिळविता आले नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. मात्र त्यांना येथे अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. मतविभाजनाचा युतीच्या उमेदवारांनी येथे सातत्याने फायदा घेतला आहे. २०१९ च्या लढतीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे तब्बल दहा वषार्नंतर आमने सामने आहेत. २००९ मध्ये डॉ. शिंगणेंचा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचेच कृष्णराव इंगळे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव हे दुसर्यांदा खासदार झाले होते. त्यामुळे यंदा १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ मधील जुने खेळाडू नव्याने डाव टाकत आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे जुन्या खेळाडूंच्या नव्या डावपेचात यंदा कोण बाजी मारते याबाबत उत्सूकता आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचीही बुलडाणा लोकसभेतील ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता सर्वसामान्यांना लागली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील युती विरुद्ध आघाडीच्या लढतीचा निकाल जिल्ह्याचे येत्या दहा ते १५ वषार्तील राजकीय ध्रुविकरण स्पष्ट करणारा ठरणार आहे.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.५३ टक्के मतदान झालयं. यात ११ लाख १७ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPrataprao Jadhavप्रतावराव जाधव