शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  सातव्या फेरीअखेर प्रतापरावांची मुसंडी; शिंगणे माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 10:38 IST

Buldhana Lok Sabha Election Results 2019

 

बुलडाणा: गत विस वषार्पासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात यंदा दुहेरी लढत झाली. वचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार यांनीही या निवडणुकीत चांगली  टक्कर दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून बुलडाण्यामध्ये  सातव्या फेरीनंतर प्रतापराव जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ५८२१३ मतं मिळाली असून, राजेंद्र शिंगणे यांच्या पारड्यात ४०३५९  मतं पडली आहेत.

१९९६ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने १९९६ मध्ये प्रथमच विजय मिळविल्यानंतर काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. १९९८  मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला येथे यश मिळविता आले नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. मात्र त्यांना येथे अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. मतविभाजनाचा युतीच्या उमेदवारांनी येथे सातत्याने फायदा घेतला आहे. २०१९ च्या लढतीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे तब्बल दहा वषार्नंतर आमने सामने आहेत. २००९ मध्ये डॉ. शिंगणेंचा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचेच कृष्णराव इंगळे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव हे दुसर्यांदा खासदार झाले होते. त्यामुळे यंदा १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ मधील जुने खेळाडू नव्याने डाव टाकत आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे जुन्या खेळाडूंच्या नव्या डावपेचात यंदा कोण बाजी मारते याबाबत उत्सूकता आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचीही बुलडाणा  लोकसभेतील ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता सर्वसामान्यांना लागली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील युती विरुद्ध आघाडीच्या लढतीचा निकाल जिल्ह्याचे येत्या दहा ते १५ वषार्तील राजकीय ध्रुविकरण स्पष्ट करणारा ठरणार आहे.बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख  ५८ हजार ९४३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.५३ टक्के मतदान झालयं. यात ११ लाख १७ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी  ५ लाख ९ हजार १४५ मते घेत विजय साकारला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांना ३ लाख ४९ हजार ५६६ मते मिळाली होती.

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाPrataprao Jadhavप्रतावराव जाधव