शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

खून प्रकरणी एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:44 IST

आरोपी अरविंद यास जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावा अशी शिक्षा सुनावली आहे.

बुलडाणा: गावात अकारण बदनामी करत असल्याचा राग मनात धरून खैरव येथील खुशाल विनायक धनवे याचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने खैरव येथील अरविंद गवई (२७) यास जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.अंबाशी खैरव शिवारात नऊ डिसेंबर २०१८ रोजी खुशाल विनायक धनवे याच्या मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर मृतक खुशालचा भाऊ चारुदत्त धनवे, पोलिस पाटील व अन्य दोन ते तीन लोकांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता खुशाल धनवे मृत झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोबतच त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुनाही दिसून आल्या होत्या. प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात चारुदत्त धनवे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान मृतकाची पत्नी रुपाली ही देऊळगाव राजा या आपल्या माहेराहून मृतक खुशाल धनवे याच्या अंत्यसंस्कारासाठी आली असता तीने आठ डिसेंबर २०१२ रोजी अरविंद गवई याने फोनवरून खुशाल धनवेस मद्य प्राशनासाठी नेत असल्याचे सांगितले होते. सोबतच त्याला झटका दाखवतो असा उल्लेखही केला होता. प्रकरणी रुपालीने पुन्हा त्यास फोन केला असता त्याने तो लॉक केला होता. या घटना क्रमाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अरविंद गवई विरोधात खूनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. प्रकरणी पोलिसांनी रुपाली व आरोपी अरविंद यांचाही फोन जप्त करीत घटनास्थळाचा पंचनामा करत प्रकरणात जबाब नोंदविले होते. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.प्रकरणात सुनावणी दरम्यान, न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तक्रारकर्ते चारुदत्त धनवे, जप्ती पंच आणि मृतकाची पत्नी, तपास अधिकारी गुलाबराव वाघ, पोलिस नाईक शरद गिरी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.अंतिम सुनावनी नंतर बुलडाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. के. महाजन यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी अरविंद यास जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावा अशी शिक्षा सुनावली आहे. सोबतच दंडाच्या रकमेपैकी २५ हजार रुपये मृतकाची पत्नी रुपाली धनवे यांना तर २० हजार रुपये मृतकाची आई यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असेही निकालात नमूद करणयात आले आहे.प्रकरणात वादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी काम पाहले तर पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ, पोलिस नाईक शरद गिरी आणि पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील पवार यांची भूमिका महत्त्वाची राहली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLife Imprisonmentजन्मठेप