शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जानेवारी महिना उजाडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:24 IST

Buldhana District Gram Panchayat News मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू असून १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

- नीलेश जोशी     लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोराना संसर्गामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रसंगी जानेवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे. सरपंच आरक्षणाच्या संदर्भाने तालुका आणि जिल्हास्तरावरील बैठका अद्याप झालेल्या नाहीत. त्यातच ग्रामसभांनाही स्थगिती असून सरपंच आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हास्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सध्या मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू असून १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींच्या होवू घातलेल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत जानेवारी महिन्यातच खऱ्या अर्थाने स्पष्ट येईल, असे सुत्रांनी संकेत दिले आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत १ डिसेंबर रोजी मतदान होत असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्याही निवडणुका लवकरच मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रथमत: तालुकास्तरावर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येवून त्यानंतर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंचांचे आरक्षण निघले. कोरोना संसर्गाची व्याप्ती पाहता अनुषंगीक विषयान्वये बोलवावयाच्या सभांबाबत जिल्हा प्रशासनाने थेट राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यासंदर्भात अद्याप उलट टपाली पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे ५२६ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाची आरक्षण प्रक्रिया रखडलेली आहे. आधीच कोरोना संसर्गामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या आता जानेवारी महिन्या अखेर होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत