शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

बुलडाणा जिल्ह्यात परदेश वारीची वाढली क्रेझ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:55 IST

बुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे.  मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे. 

ठळक मुद्देतीन वर्षांतील चित्र १३ हजार नागरिकांनी काढला पासपोर्ट

सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे.  मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे. परदेशाबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. तिथली संस्कृती, विकास, सोयी-सुविधा, आधुनिक साधने, नैसर्गिक सौंदर्य याबाबत कुतूहल असते. चित्रपट, पुस्तके व इंटरनेटसारख्या जलद माध्यमांमधून दुस-या देशांविषयीची माहिती मिळत असते. सहाजिकच तिथल्या चांगल्या गोष्टींची, वेगळेपणाची भुरळ पडते. कधीतरी परदेशाला भेट द्यावी, अशी इच्छा निर्माण होते. टुरिस्ट कंपनीच्या सवलतीमधील सहलींमुळे अनेकांचे परदेश वारीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अर्थात, सर्वांनाच परदेश वारी शक्य होतेच असे नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असणारे सोयीप्रमाणे परदेश भ्रमंती करतात. परदेशात जाणारे अथवा जाण्यास इच्छुक असणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०१५ पासून आतापर्यंत जवळपास १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्टसाठी नोंदणी केली. साधारपणे साडेचार हजार नागरिक दरवर्षी पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करतात. परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. त्याशिवाय परदेशात जाता येत नाही. तसे केल्यास तो गुन्हा मानला जातो. पासपोर्ट हे परदेशात जाण्यासाठीचे ओळखपत्र असते. त्यासाठी नजीकच्या विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागते. त्यानंतर संबंधित क्षेत्रीय पारपत्र कार्यालयातून कागदपत्रे, इतर तपासणी व पोलीस व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट मिळतो. जिल्ह्यात सध्या परदेशी प्रवासाची क्रेझ वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पासपोर्टचे प्रकार  पासपोर्ट तीन प्रकारचे असून, त्याचे रंग वेगवेगळे असतात. राजनैतिक पासपोर्ट लालसर रंगाचा असतो. सरकारी पासपोर्ट पांढरा तर सामान्य पासपोर्ट हा सामान्य नागरिकांसाठी असून, त्याचा रंग निळसर असतो.  दीड हजार रुपये शासकीय शुल्क भरून आपल्याला पासपोर्ट काढता येतो. आता टॅब प्रणालीमुळे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. 

परदेश वारीचा टक्का वाढला! पर्यटन, शिक्षण, नोकरी, नातेवाइकांच्या भेटी व इतर कामाच्या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  गत तीन वर्षांत पासपोर्टसाठी दाखल अर्जावरून याचा अंदाज येतो. २०१५ मध्ये ४ हजार १००, २०१६ मध्ये ३ हजार ८८२, २०१७ मध्ये ४ हजार ३४८ तर चालू वर्षात १३ मार्चपर्यंत १ हजार १३३ नागरिकांनी पासपोर्ट काढण्यासाठी येथील विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा