शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : बोंडअळीने झालेल्या नुकसानाचा शेतकर्‍यांना मोबदला द्या - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:58 IST

बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देबोगस बियाणे निर्मिती करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्‍या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बोगस बिटी बियांण्यांमुळे हा प्रकार घडला असून,  शेतकर्‍यांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करत मोबदला म्हणून त्यांच्याकडून व सरकारकडून शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, १९ डिसेंबर रोजी शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर खा. प्रतापराव जाधव यांनी मागण्या मांडत पांढर्‍या सोन्याची अर्थात कापसामुळे निर्माण झालेल्या शेतकर्‍यांच्या जीवनातील  काळी बाजू मांडली. यावेळी खा. जाधव म्हणाले की,  बिटी बियाण्यांवर अळीचा हल्ला होऊ नये म्हणून आवश्यक जीन्स त्यात टाकले जातात; मात्र असे असतानाही जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा बोंडअळीच्या हल्ल्याने हंगाम हिरावल्या जात आहे. पाच ते सात  फुटापर्यंत कपाशी वाढली. बोंडांची संख्या नेहमीपेक्षा दीडपट असल्याने उत्पन्नाची आशाही शेतकर्‍यांना होती; मात्र पांढर्‍या सोन्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. १00 क्विंटलच्या आसपास उत्पादन देणार्‍या शेतामधून १0 क्विंटलही कापूस होऊ शकला नाही. बिटी कॉटनचे बियाणे निर्माण करणार्‍या कंपन्यासोबत अँग्रीमेंटही शेतकर्‍यांनी केले होते. तरीही कापसाच्या उत्पादनात म्हणता येईल, असा खास नफा दिसून आलेला नाही. एका अंदाजानुसार ५0 ते ८0 टक्के कापसाच्या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. कपाशीच्या या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांची नाराजी बियाणे विक्री करणार्‍या आणि त्यासंबधी अँग्रीमेंट करणार्‍या कंपन्यांबाबत आहे. शेतकर्‍यांजवळ बियाणे खरेदी रेकॉर्ड, रिकाम्या बियाण्यांच्या थैल्या व इतर सहायक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सरकारी आर्थिक मदत मिळण्यास त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील आणि खासकरून विदर्भातील गुलाबी बोंडअळीच्या या हल्ल्यापासून बचावासाठी बिटी कॉटन बियाणे उपलब्ध करणारे दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच या कंपन्यांकडून व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना मोबदला मदत म्हणून देण्यात यावा, अशी मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाcottonकापूस