शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा: देऊळगाव राजात गॅलरी कोसळून चिमुकली ठार, एक गंभीर

By निलेश जोशी | Updated: September 7, 2023 22:42 IST

दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मानसिंगपुरा भागातील घटना

देऊळगाव राजा: येथील मानसिंगपुरा भागात दहीहंडी पहाण्यासाठी गेलेल्या दोन मुलींच्या अंगावर सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी कोसळून एक मुलगी ठार तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

निदा रशीद खान पठाण (९) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव अल्फिया शेख हाफीज (८) असे आहे. तिच्यावर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तातडीने जालना येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती देऊळगाव राजा पोलिसांनी दिली आहे.

गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी देऊळगाव राजात दहीहंडीचा कार्यक्रम मानसिंगपुरा आयोजित करण्यात आला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असतांना दहीहांडीसाठी बांधलेल्या दोरीसह एका घराची लोखंडी गॅलरी कोसळून ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक लोखंडी गॅलरी कोसळल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्यांनी धावपळ करत सुरक्षीत जागा शोधली.

दरम्यान, नंतर काही जण घटनास्थळी गेले असता या दुर्घटनेची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आली. मृत पावलेली निदा रशीद खान पठाण आणि गंभीर जखमी झालेले अल्फिया शेख हाफीज या दोघी लोखंडी गॅलरीखाली उभ्या राहून दहीहंडीचा कार्यक्रम पहात होता. त्यादरम्यान अचानक ही दुर्घटना घडली. ज्या घराची ही लोखंडी गॅलरी पडली. ते घर बंद होते. तेथे कोणी रहात नव्हते, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी वृत्त लिहीर्पंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.