शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: बोरगाव वसू येथे वीज पडून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:34 IST

चिखली: बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस पडत असून, रविवारी चिखली तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. दरम्यान, रविवारी चिखली तालुक्यातील पावसादरम्यान वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना बोरगाव वसू येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे जिल्ह्यात दुस-या दिवशीही अवकाळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस पडत असून, रविवारी चिखली तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. दरम्यान, रविवारी चिखली तालुक्यातील पावसादरम्यान वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना बोरगाव वसू येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.रामेश्वर प्रल्हाद सपकाळ (४५) असे वीज पडून ठार झालेल्या शेतक-याचे नाव आहे. बोरगाव वसू  परिसरात असलेल्या शेतातून ते आपले काम आटोपून घरी येत होते. गावानजीक बसस्थानकाजवळ ते पोहोचले असता परिसरात सोसाट्याचा वारा सुटून आभाळ भरून आले. या दरम्यान, विजांचा कडकडाट झाला आणि वीज रामेश्वर प्रल्हाद सपकाळ यांच्या अंगावर पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून घाटावरील काही भागात वादळी वाºयासह पाऊस होत असून, बुलडाणा शहर व चिखली तालुक्यातील काही भागात रविवारी पाऊस झाला. या पावसामुळे  अनेक भागात झाडे पडली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, तर काही परिसरातील आंब्याचे नुकसान झाले आहे; मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. बुलडाणा तालुक्यातील काही परिसरात पाऊस तर काही परिसरात चटके देणारे ऊन असल्याचे दिसून आले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी अनेक ठिकाणी उकाडा कायम होता. बुलडाण्यात पाऊस बुलडाणा: शहरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात हलकासा पाऊस झाला, तर सुंदरखेड परिसरात १० मिनिटे चांगला पाऊस पडला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. शनिवारी सिंदखेड राजा तालुका व लोणार तालुक्यातील काही भागात पाऊस झाला होता, तर सिंदखेड राजा तालुक्यात काही ठिकाणी झाडे तुटली होती. रविवारी बुलडाण्यात बाजारचा दिवस असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बुलडाण्यात तापमानाचा चटका जाणवू लागला होता. एप्रिलमध्ये तर शहरातील तापमान ३९ अंशापर्यंत पोहोचले. वातावरणातील उष्णता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते; मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हापासून बचाव झाला. दरम्यान रविवारी दुपारी ढगांचा गडगडाट व वाºयासह पाऊस पडला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा