शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पालिकांच्या कर वसुलीचे ‘घोडे’ अडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:33 IST

खामगाव: मालमत्ता  कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगरपालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. कर वसुलीसाठी अवघे २०-२१ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इतक्या कमी दिवसांमध्ये या पालिकांच्या कर वसुलीची उद्दिष्टपूर्ती होणार तरी कशी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे जळगाव जामोद अपवाद देऊळगावराजा व खामगाव काठावर पास!

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मालमत्ता  कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगरपालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. कर वसुलीसाठी अवघे २०-२१ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इतक्या कमी दिवसांमध्ये या पालिकांच्या कर वसुलीची उद्दिष्टपूर्ती होणार तरी कशी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.       स्थानिक स्वराज्य संस्थांना शासकीय अनुदानासाठी राज्य शासनाने मालमत्ता आणि पाणी पट्टी वसुलीची सक्ती केली आहे. प्रत्येक नगरपालिका आणि पंचायत समितीला १०० टक्के कर वसुलीची सक्ती करण्यात आली;  मात्र शासनाच्या या कसोटीत आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील केवळ  जळगाव जामोद  पालिका  खरी उतरली आहे. उर्वरित १० पालिका आणि दोन नगर पंचायतींची कामगिरी अतिशय सुमार असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये कर वसुलीसाठी बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद या एकमेव पालिकेने लक्ष केंद्रित केले, तर उर्वरित पालिका आणि नगर पंचायतींनी अपेक्षित प्रयत्न केले नसल्याचे दिसून येते.  उपलब्ध आकडेवारीनुसार माहे १ एप्रिल, २०१७ ते ०३ मार्च, २०१८ पर्यंतच्या कालावधीत कर वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिकेने सर्वाधिक ९६.२३ टक्के मालमत्ता कराची वसुली केली आहे.  देऊळगावराजा पालिकेने ४०.५६ टक्के कर वसुली करीत दुसरे स्थान पटकावले आहे, तर खामगाव पालिका (३६.१०) तिसºया स्थानावर आहे. नीचांकीमध्ये  मलकापूर, मेहकर, मोताळा आहे.

कर वसुलीत जिल्ह्यातील १० पालिका माघारल्या! मालमत्ता कराच्या अपेक्षित वसुलीसाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे. नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन कापण्याची कारवाई, सोबतच काही बड्या थकबाकीदारांना कायदेशीर नोटीसही देण्यात येत आहेत. कारवाईच्या बडग्यामुळे कराचा भरणा करण्यासाठी नागरिक समोर येत आहेत. दरम्यान, कर वसुलीत ११ पैकी १० पालिका कमालीच्या माघारल्या आहेत. यामध्ये मलकापूर पालिकेसोबतच मोताळा पंचायत समितीचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा