शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

बुलडाणा जिल्ह्याती अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:18 IST

बुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका वर्गाची निवड एनसीईआरटीने रॅण्डम पद्धतीने केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री चालणार्‍या अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार आहे.

ठळक मुद्देनॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे विद्यार्थ्यांची रॅण्डम पद्धतीने निवड

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका वर्गाची निवड एनसीईआरटीने रॅण्डम पद्धतीने केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री चालणार्‍या अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार आहे.शासन निर्णयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांचे फलित काय, हे तपासण्यासाठी शासनाने सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्याला एनएएस (नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे) हे नाव देण्यात आले आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवडलेल्या वर्गातील ३0 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीत बहुपर्यायी प्रश्न राहणार आहेत. १0 वीसाठी भाषा, गणित व पर्यावरण शाळा, सामाजिकशास्त्र या चार विभागातील ६0 प्रश्न राहणार आहे. दोन तासांची वेळ दिली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी जिल्हा स्तरावर डीएमयूची रचना करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. हे पथक चाचणी सुरू असताना कोणत्याही शाळेला भेट देणार आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील ८0 शाळांची निवडनॅशनल अचिव्हमेंट सर्वेसाठी राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील ८0 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील १0, चिखली ९, देऊळगाव राजा ५, जळगाव जामोद ४, खामगाव १0, लोणार ५, मलकापूर ५, मेहकर ९, मोताळा ४, नांदूरा ६, संग्रामपूर ३, शेगाव ५ व सिंदखेड राजा तालुक्यातील ५ अशा एकूण ८0 शाळांची निवड करण्यात आली आहे.

चाचणीसाठी शासकीय स्तरावरून एक पर्यवेक्षकचाचणी घेण्यासाठी प्रत्येक शाळेत शासकीय स्तरावरून एक पर्यवेक्षक दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकीटसुद्धा परीक्षेच्यावेळी शासकीय पर्यवेक्षकांसमोरच उघडायचे आहे. त्यावर पर्यवेक्षक व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यावी लागेल. वर्गातील ३0 विद्यार्थ्यांची चाचणी होणार असली तरी त्यादिवशी १00 टक्के विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी शाळेवर टाकण्यात आली आहे. चाचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी निळा किंवा काळा बॉलपेनचा वापर करायचा आहे. निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पर्यवेक्षकांकडे द्यावे लागणार आहे.

उत्तर पत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्य स्तरावर जाणारचाचणी झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्य स्तरावर जाणार आहेत. राज्य स्तरावर ओएमआर पद्धतीने तपासणी होऊन तालुकानिहाय निकाल एनअेएसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निकालावरून तालुक्यांची तुलना करता येईल.  या निकालावरून कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा