शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

बुलडाणा जिल्हय़ात टंचाईत विहीर अधिग्रहणावर भिस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:43 AM

बुलडाणा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या असून, ६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. विहीर अधिग्रहणावर ३ कोटी २७ लाख ६0 हजार रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ५ कोटी ८८ लाख रुपयांचा आराखडा निर्माण करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेतविहिरींसाठी ३ तर टँकरसाठी ५ कोटी ८८ लाखांचा आराखडा 

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या असून, ६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. विहीर अधिग्रहणावर ३ कोटी २७ लाख ६0 हजार रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ५ कोटी ८८ लाख रुपयांचा आराखडा निर्माण करण्यात आला आहे. हिवाळ्यापासूनच जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईचे चटके जाणवतात. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्याच्या दृष्टीने जानेवारीमध्ये प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या दुष्काळी काळात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा आधार घेतला जात असून, दरवर्षी प्रत्येक तालुक्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांच्या पाण्याची पातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. काही गावांमध्ये यंदा शेतीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचीही परिस्थिती अतिशय बिकट होत आहे.  पाणीटंचाईची समस्या डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाकडून विहीर अधिग्रहणावर भर देण्यात आला आहे. यावर्षी ६५३ गावांमध्ये ७१९ खासगी विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे, तसेच आतापर्यंत ४४ गावांमध्ये ५८ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या असून, त्यावर ५१ लाख २९ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे, तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकर प्रस्तावित आहे. त्यापैकी धोत्रा नंदई व मेरा बु.असे दोन टँकर सुरू आहेत. दोन गावात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरू असून, त्यासाठी १९ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. यावर्षी ४६ गावांसाठी ७0 लाख ६६ हजार रुपये खर्च झाला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी