शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण ‘रेफर’ करण्याचे प्रमाण वाढले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:39 IST

बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण औरंगाबाद रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून, घाटी रुग्णालयाने या संदर्भात सूचना दिल्या आहेत; मात्र याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील काही रुग्णवाहिकाही किरकोळ दुरुस्तीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा आर्थिक फटका गरीब रुग्णांना बसत आहे.

ठळक मुद्देरुग्णांना आर्थिक फटका किरकोळ दुरुस्तीअभावी रुग्णवाहिका उभ्या!

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण औरंगाबाद रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून, घाटी रुग्णालयाने या संदर्भात सूचना दिल्या आहेत; मात्र याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील काही रुग्णवाहिकाही किरकोळ दुरुस्तीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा आर्थिक फटका गरीब रुग्णांना बसत आहे.मराठवाडा, जळगाव खान्देशच्या सीमा लगत असलेल्या गावांसह जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे आशास्थान म्हणून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे भरघोस निधी देण्यात आला आहे. सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी सर्व सोयीयुक्त इमारतीसह अत्याधुनिक मशीन देण्यात आला आहे. याशिवाय विविध आजारांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत; मात्र मागील काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे, तज्ज्ञ अधिकार्‍यांच्या कमतरता आदी कारणामुळे अनेक गरीब रुग्णांना उपचार न घेता खासगी किंवा इतर शहरात उपचारासाठी धाव घ्यावी लागते.बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अपघातांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे; मात्र अनेक अपघातील रुग्णांवर प्राथमिक उपचार करून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत आदी कारण पुढे करून रूग्णांना अकोला, औरंगाबाद  रेफर करण्यात येत आहेत. त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध रुग्णवाहिकेपैकी अध्र्या रुग्णवाहिका किरकोळ दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णवाहिकेद्वारे रुग्ण रेफर करण्यात येते. यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रेफर केंद्र अकोला; मात्र रुग्णांची मानसिकता औरंगाबादजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णास रेफर करण्यासाठी शासनाने अकोला केंद्र दिले आहे; मात्र सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांना रेफर करण्यासाठी नातेवाईक औरंगाबाद केंद्राचा आग्रह धरतात. त्यामुळे रुग्णांना रेफर करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रुग्णास रेफर करण्यासाठी जीवनदायी योजनेंतर्गत १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध असते; मात्र या रुग्णवाहिकेद्वारे रुग्णास अकोला येथे नेण्याची सुविधा दिली आहे; मात्र रुग्णाच्या नातेवाइकांची मानसिकता औरंगाबाद असल्यामुळे रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात येतो. तसेच जीवनदायी योजनेचा लाभ न घेणार्‍या रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते; मात्र यासाठी येणारा खर्च हा खासगी रुग्णवाहिकेच्या खर्चापेक्षा जास्त असल्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णवाहिकेचा वापर करताना दिसून येतात.

तीन रुग्णवाहिका धूळ खात उभ्याजिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात  ६ रूग्णवाहिका पैकी ५ रुग्णवाहिका उभ्या आहेत. त्यापैकी तीन रुग्णवाहिका किरकोळ दुरुस्तीअभावी धूळ खात उभ्या आहेत. त्यात एमएच ३0 एच ५१४७, एमएच २८ एच ५0२२ व एमएच २८ एच ५0६३ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा समावेश आहे, तर सुरू असलेल्या तीन रुग्णवाहिकेपैकी  एक रुग्णवाहिका किरकोळ दुरुस्तीसाठी सोमवारी अकोला येथे पाठविण्यात आली होती. उभ्या दोन रुग्णवाहिकेपैकी एक रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा असलेल्या १0८ क्रमांकाच्या कॉलसाठी होती. तर इतर एक रुग्णवाहिका ग्रामीण भागातील गरोदर महिला इतर सेवेसाठी असलेल्या १0२ क्रमांकाच्या कॉलसाठी ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीमुळे अपघातातील रुग्ण आल्यास त्याला इतर ठिकाणी रेफर करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रेफर रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा नियमित दिली जाते; मात्र रेफर केंद्र अकोला असताना रुग्णांच्या नातेवाइकांचा आग्रह औरंगाबाद असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी मानसिकता बदलून रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.-डॉ. भागवन भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल