शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:13 IST

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली.  जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे.

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली.  जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, लवकर पहिली सोडत होणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेश प्रक्रियेला ८ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. राज्यात सन २०१९-२० साठी आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत शाळांच्या नोंदणीसाठी ८ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ५ मार्चपासून पालकांसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याला सुरूवात झाली होती. दरम्यान, ३० मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज भरण्यात आले. जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून जिल्हाभरातून ५ हजार ४१० अर्ज आले आहेत. आता विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित सोडत पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. दरम्यान, सोडत पद्धतीची ही प्रक्रिया लवकरच जाहीर होईल. त्यामुळे अर्ज केलेल्या पालकांना आता पुन्हा सोडत साडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पालकांना आपल्या पाल्याचा शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी आरटीईचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी अनेक पालकांची आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेवर मदार दिसून आली. परिणाम स्वरूप  अडचणीच्या काळातही आरटीईच्या आॅनलाइन प्रवेश अर्जाची संख्या साडेपाच हजारावर गेली.  संकेतस्थळही होते ‘स्लो’यावर्षी सुरूवातीपासून आरटीईचे संकेतस्थळ स्लो चालत असल्याची ओरड पालकांमधून होत होती. दरम्यान, मध्यंतरी अर्ज प्रक्रियेची मुदतही वाढवून देण्यात आली होती. परंतू संकेतस्थळाच्या अडचणी कायमच होत्या. आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने अनेक पालक सध्या अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा