शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अन्.. जिल्हाधिकारी थिरकले आदिवासी विद्यार्थ्यांसोबत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 11:56 IST

Buldhana Collector dance with tribal students : जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी गाव चारबनच्या विद्यार्थ्यांसोबत वाद्यवृंदावर ताल धरला.

जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी गाव चारबनच्या विद्यार्थ्यांसोबत वाद्यवृंदावर ताल धरला. निमित्त होते जागतिक आदिवासी दिनाचे.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य असल्याने जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा चारबन येथे वृक्षारोपण व बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी सुरुवातीला शाळेच्या प्रवेशद्वारावर परंपरागत आदिवासी पोशाखातील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यापाठोपाठ आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांचे पारंपारिक आदिवासी स्वागत गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदिवासी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पारंपारिक नृत्य प्रकार आहे. शाळेतील मुलांनी मनमोहक आदिवासी नृत्य प्रकार सादर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व अधिकाऱ्यांनीही त्या वाद्यावर ताल धरला. त्यामुळे शिक्षकवृंदांसह आसन सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी चारबन शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे, दीपक उमाळे, माधव मोसंबे, ममता गावित यांचे  अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख केशरसिंह राऊत, चारबन शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद