शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा : पाच दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

By विवेक चांदुरकर | Updated: April 21, 2023 17:00 IST

पाच दिवस जिल्ह्यात हलका अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

खामगाव : गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता पुन्हा आगामी पाच दिवस जिल्ह्यात हलका अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान खात्याने २१ एप्रिल रोजी वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान तुरळक, काही ठिकाणी हलक्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. २१, २२, २४ व २५ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. २१, २४ व २५ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या शेतमालाची, भाजीपाल्याची व तोडणी केलेल्या फळांची योग्य ती काळजी घ्यावी, तसेच संबंधित शेतमाल, भाजीपाला व फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावे. सध्याचे तापमान व वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकांचे अवशेष जाळू नये, तसेच हवामान परिस्थिती पाहता पिकांना, फळबागांना व भाजीपाला पिकांना वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसू नये म्हणून नियमितपणे शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीने ओलीत करावे, कांदा पीक परिपक्व अवस्थेत असताना किंवा काढणीच्या ८-१५ दिवस अगोदर ओलीत बंद करावे. त्यामुळे कांदा काढणे सोयीचे होईल, असा सल्ला देण्यात आला आहे.

जनावरांना धोकामेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत. जनावरांना उघड्यावर चरायला जाऊ न देता, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच करावी. विजांबाबत अचूक पूर्वसूचना प्राप्त होण्यासाठी व जीवितहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.भारतीय हवामान खात्याने २१ एप्रिल रोजी वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान तुरळक, काही ठिकाणी हलक्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, पशुपालकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.मनेष येदूलवार,जिल्हा कृषी हवामान केंद्र,कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस