बुलढाणा - खामगाव अकोला ते इंदौर या मध्य प्रदेश परिवहनच्या बसला नांदुरानजिक आंबोडा फाटा जवळ चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या टिप्परने मंगळवारी सकाळी ७.२० वाजता धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. एकूण १६ जखमी झाले. त्यापैकी ३ जण गंभीर जखमी आहेत.
जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. गंभीर जखमींना अकोला येथे पाठवण्यात आले.मृतांमध्ये टिप्परचालक पातोड्या मालसिंग भैय्यड्या, प्रेमसिंग धारवे, दोघेही रा. नांगरटी, धानोरा महासिद्ध, ता. जळगाव जामोद, तसेच बळीराम कोतवाल यांच्यासह बसमधील एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींमध्ये खामगाव, अकोला, अमरावती येथील प्रवाशांचा समावेश आहे.