शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप

By सदानंद सिरसाट | Updated: May 26, 2023 19:28 IST

Buldhana News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.

- सदानंद सिरसाटबुलढाणा -  संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तामगाव पोलिसात १५ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकरणाच्या दाखल तक्रारीनुसार आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण २०१२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

एका गावातील पीडिता दुपारी राॅकेल आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी घरी येताना रस्त्यावर ओळखीचा सय्यद नाजीम नावाचा व्यक्ती उभा होता. त्याने तिला बोलाविले. तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या पाठोपाठ खोलीत गेली. त्यावेळी त्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व कुणाला काही सांगितल्यास मारून टाकेल, अशी धमकी दिली. तीने ही घटना आईला सांगितली. वडील घरी आल्यावर आई-वडिलांसह पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंके यांनी केला. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणात पीडिता, तिची आई व इतर साक्षीदार फितूर झाले.

सरकारी वकिलांच्या उलट तपासणीदरम्यान साक्षीदारांवर दबाव असणे, तसेच घटनेनंतर फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना लोकांनी गावाबाहेर काढल्याने ते दुसऱ्या गावात गेले. तसेच या घटनेमुळे फिर्यादी हिचे लग्न ठरत नाही, अशा बाबी पुराव्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी भूपेंद्र पाटील यांची साक्ष, तसेच महिला पोलिस कविता इंगळे, महिला दक्षता समितीच्या सदस्या नंदा सोनोने, पोलिस अधिकारी बी. आर. गिते याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीदारांचा पुरावा आणि शासकीय अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कलाम यास आजन्म सश्रम कारावासाची उर्वरित संपूर्ण आयुष्यभरासाठी सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुद्धा आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. रजनी बावस्कार भालेराव यांनी काम पाहिले. कोर्ट मोहरर पोलिस अमर कस्तुरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा