शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: दोन महिन्यांपूर्वी पळून गेलेले युगुल पोलिसांच्या ताब्यात, युवकावर अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Updated: May 19, 2024 20:14 IST

Buldhana News: सव्वा दोन महिन्यांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षे ६ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पाेलिसांनी तपासादरम्यान १७ मे रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातून आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.

- सदानंद सिरसाट  संग्रामपूर (बुलढाणा) - सव्वा दोन महिन्यांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षे ६ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पाेलिसांनी तपासादरम्यान १७ मे रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातून आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. मुलीचे बयान नोंदवून आरोविरुद्ध अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली.

याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून ८ मार्च रोजी तामगाव पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल होता. त्यावर तामगाव ठाण्यातील तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, हेकाॅ अनिल सुशीर, महिला पोकॉ सपना पवार यांनी तपास केला. त्यामध्ये १७ मे रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातून आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे बयान नोंदवले. तपासाअंती विविध कलमान्वये गुन्ह्यामध्ये वाढ केली.

७ मार्च रोजी घडली होती घटना७ मार्च रोजी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शौचास जात असल्याचे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मुलीची शोधाशोध सुरू असतानाच तालुक्यातील दुसऱ्या गावातील कुंभारखेड येथील युवकाच्या दुचाकीवर बसून गेल्याची माहिती मिळाली. ८ मार्च रोजी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यानुसार तामगाव पोलिस ठाण्यात कुंभारखेड येथील २३ वर्षीय आरोपीवर कलम ३६३ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. १७ मे रोजी त्यामध्ये वाढीव कलम ३६६ (अ), ३७६, ३७६ (२), (एन) भादवी सहकलम ४ (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती तामगाव पोलिसांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक जीवन सोनवणे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी