शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana : कोवीड रुग्णालयातील २,५७६ खाटा रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:15 IST

Buldhana Covid-19 जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड हॉस्पीटल व हेल्थ सेंटर मिळून ३, २५० खाटा रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सद्या जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, हेल्थ सेंटर आणि डेडीक हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असलेल्या ३, २५० खाटांपैकी २,५७६ खाटा रिकाम्या असल्याचे चित्र आहे. कोराना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यावर पोहोचले असल्याचा प्रथमदर्शनी हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, असे असले तरी येत्या काळात कोरोनाच्या चाचण्या वाढल्यानंतर रुग्णायात बाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुसरीकडे त्यासंदर्भाने विचार करता १३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात पाच कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे कोरोना बाधीत व्यक्ती मृत्यू पावण्याचे प्रमाण हे १.३७ टक्क्यावर पोहोचले आहे. जिल्हयात आतापर्यंत १११ कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने यातील बहुतांश मृत्यू हे एकट्या सप्टेंबर महिन्यात झाले असून त्याची संख्या जवळपास ५६ च्या आसपास जाते. मात्र सध्या कोरोना बाधीत रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही कोरोनामुळे मृत्यू होणाºयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्याही वाढण्याची भिती आहे.जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड हॉस्पीटल व हेल्थ सेंटर मिळून ३, २५० खाटा रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहे. संभाव्य रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या सुविधेमध्ये तथा खाट्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र तुर्तास तरी कोरोनासंर्भाने उपाययोजना करताना उपलब्ध करण्यात आलेल्या खाटांपैकी ७९ टक्के खाटा या रिकाम्या असल्याचे एकंदरीत चित्र आहे. सध्या रुग्णालयात ४१२ बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या