लोकमत न्यूज नेटवर्कडोमरुळ : धाड-धामणगाव मुख्य मार्गावरील शेतकर्याच्या गोठय़ातून अज्ञात चोरट्याने सोयाबीन, तूर आणि हरबर्याचे तब्बल ३१ कट्टे लंपास केले असून, यामध्ये शेतकर्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.येथील शेतकरी एस. के. धंदर यांनी काही दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन, तूर आणि हरबर्याचे खळे करून धान्य गोठय़ात ठेवले होते. सात फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हे धान्य चोरले. यामध्ये २0 कट्टे सोयाबीन, तुरीचे सात आणि हरबर्यांची चार अशी एकूण ३१ टक्के चोरी गेले आहेत. चारचाकी वाहनातून हा माल नेण्यात आला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वीही या भागातून असेच धान्य चोरीस गेले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात एएसआय भुतेकर, शिपाई दराडे यांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली. अद्याप प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.
बुलडाणा : शेतकर्याच्या गोठय़ातून १.२५ लाखांचे धान्य लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:02 IST
डोमरुळ : धाड-धामणगाव मुख्य मार्गावरील शेतकर्याच्या गोठय़ातून अज्ञात चोरट्याने सोयाबीन, तूर आणि हरबर्याचे तब्बल ३१ कट्टे लंपास केले असून, यामध्ये शेतकर्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
बुलडाणा : शेतकर्याच्या गोठय़ातून १.२५ लाखांचे धान्य लंपास!
ठळक मुद्देचोरट्याने सोयाबीन, तूर व हरबर्याचे ३१ कट्टे लंपास केले