शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बुलडाणाजिल्ह्याला ५० पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 15:20 IST

७५ वर्षीय मोहन सिंग तोमर यांनी ८००, १५०० व पाच किलोमीटर चालणे या स्पर्धेमध्ये तीन गोल्ड मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे झालेल्या मास्टर्स अ‍ॅथलेटीक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २३ खेळाडूंनी ५० पदकांची कमाई केली. या स्पर्धेमध्ये ३५ ते ९० वर्षातील महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये ७५ वर्षीय मोहन सिंग तोमर यांनी ८००, १५०० व पाच किलोमीटर चालणे या स्पर्धेमध्ये तीन गोल्ड मिळविले.मिरज येथे पार पडलेल्या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या माध्यमातून त्यांनी विविध पदाकांची कमाई केली. ६० वर्षीय साहेबराव बोरकर यांनी पाच किमी धावणे व १५००, २००९ मीटर स्पर्धेमध्ये अनुक्रमे दोन सुवर्ण व एक रजत पदक मिळविले. ५५ वर्षीय पंडित यदमाळ यांनी गोळाफेक व २०० मीटरमध्ये रजत पदक, गजानन सरदार यांनी हॅमरथो व ४०० मीटर धावणे सुवर्ण व रजत पदक, ५० वर्षीय अनिल खराटे यांनी उंच उडीमध्ये सुवर्ण पदक, ४५ वर्षीय मनोहर म्हळसने यांनी रिले दोडमध्ये रजत पदक, रमेश पवार यांना लांब उडीमध्ये सुवर्णपदक, ४० वर्षीय गजानन जाधव यांनी १००, २०० मीटरमध्ये रजत पदक, प्रसाद पत्की स्टिपलचेसमध्ये रजत अंकुश जाधव व उंच उडीमध्ये कांस्यपदक, डॉ. बाबाराव सांगळे यांना पाच किमी चालणे व भालाफेक अनुक्रमे सुवर्ण व कांस्य पदक तर ३५ वर्षीय विलास सौंदलकर यांना लांब उडी व हॅमरथो सुवर्ण व रजत पदक मिळाले. संदीप शेळके स्टिपलचेस व पाच किमी धावणे रजत व कांस्य, संदीप भिसे लांब उडी रजत, सिद्धार्थ जाधव लांब उडी रजत, रवी लोखंडे उंच उडी व लांब उडी सुवर्ण, रजत पदक पटकाविले.या स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंनी सुद्धा फार मोठी बाजी मारली. त्यामध्ये ४५ वर्षीय ममता ठाकूर यांनी पाच किमी चालणे, पाच किमी धावणे व १५०० मीटर धावणे दोन सुवर्ण, रजत पदक, ३५ वर्षीय स्मिता जाधव यांनी पाच किमी चालणे व पाच किमी धावणे अनुक्रमे सुवर्ण, रजत कांस्यपदक मिळविले. उषा इंगळे यांनी उंच उडी, १००, २०० मीटर धावणे अनुक्रमे सुवर्ण व दोन रजत, स्वाती शेळके तिहेरी उडी व १५०० मीटर धावणे सुवर्ण व कांस्य, पूर्वा सौंदलकर यांनी पाच किमी चालणे, थाळीफेक अनुक्रमे दोन रजत व कांस्य, वर्षा सांगळे यांनी पाच किमी चालणे व भालाफेक अनुक्रमे रजत व कांस्यपदक मिळविले.वरील खेळाडूंची ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मणिपूर (इंफाळ) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील मास्टर्स खेळाडूंच्या कामगिरीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष आंबेकर व सचिव डॉ. बाबाराव सांगळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा